ओंकार साखर कारखाना परिवार उत्कृष्ट साखर उद्योग पुरस्काराने सन्मानित

 

ओंकार साखर कारखाना परिवार उत्कृष्ट साखर उद्योग पुरस्काराने सन्मानित  

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 24/09/2025 : साखर उद्योगातील तंञज्ञान क्षेञातील आघाडीची संस्था ङेक्कन शुगर असोसिएशन इंडिया या संस्थेच्या वतीने साखर उद्योगात भरीव योगदान देणाऱ्या ओंकार साखर कारखाना परिवारास उत्कृष्ट साखर उद्योग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ या मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार ओंकार साखर कारखाना परिवाराचे संचालक ओमराजे बोञे पाटील यांनी स्वीकारला.

ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील संचालिका रेखाताई बोञे पाटील प्रशांतराव बोञे पाटील   यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र  व कर्नाटक व इतर परिसरामधील बंद अवस्थेत असणाऱ्या साखर कारखान्यांना ऊर्जीतावस्थेत आणुन परिसरातील शेतकऱ्यांच्या ऊसाचे गाळप करून समाधानकारक ऊसास दर दिला. रोजगार निर्माण करून तरूणांच्या हाताला काम दिले असुन परिसराचा कायापालट केला व  सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी सहकारी बॅकेचे प्रशासक विधाधर अनास्कर, इंडिया शुगर मिल अध्यक्ष बी बी ठोंबरे, संजय अवस्थी श्री एन् चिन्नप्पन यासह मान्यवर उपस्थित होते. बोञे पाटील यांचे अभिनंदन आधिकारी, कर्मचारी, शेतकरीवर्ग, बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिष्ठान   यांच्या वतीने करण्यात आले.

     "हा पुरस्कार ओंकार परिवारातील आधिकारी, कर्मचारीवर्ग, ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार यांच्या नियोजनबद्ध कामामुळेच मिळाला"- ओमराजे बोञे पाटील

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या