💢 जगायचं राहूनच गेलं‼️

 💢 जगायचं राहूनच गेलं‼️ 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 11/09/2025 :


संसाराच्या जबाबदाऱ्या

सख्या पार पाडताना,

माझं जगायचं राहूनच गेलं

अन् चाळिशीत मला उमगलं.


"आता उपयोग काय त्याचा?"

उतार वयाकडे झुकले,

राहिलेलं आयुष्यही आता

असंच जगत राहायचं!


असा विचार करून मी

पुन्हा लागले कामाला.

पण चैन कुठे पडते

माझ्या थकलेल्या मनाला?


नवीन काहीतरी करायचं,

असं सारखंच वाटायला लागलं.

रोजची दिनचर्या नकोशी झाली,

मग मार्ग बदलायचं ठरवलं.


जबाबदाऱ्यांचं ओझं कमी करत

छंद जोपासायला लागले मी,

आणि आयुष्यचं पालटलं!

नवीन ऊर्जा रोमारोमात भरली.


जे आहे ते स्वीकारून

मस्त जगायला लागले,

घरच्यांसोबत असतानाही

स्वतःसाठी जगायला शिकले!

                       ✍️सौ.धनश्री म्हेत्रस  पुणे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या