🟡 श्री शंकर स. सा. कारखान्याची 58 वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 29/09/2025 :
सदाशिवनगर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील श्री शंकर स. सा. कारखान्याची 58 वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली.
यावेळी काकासाहेब व आक्कासाहेब आणि पप्पासाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ सभासदांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील,विधान परिषदेचे आमदार तथा श्री शंकर सहकारी कारखान्याचे चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर ,जि प माजी उपाध्यक्ष मा. बाबाराजे देशमुख, शिवामृत दूध व्हा. चेअरमन दत्तात्रय भिलारे, महर्षि कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकराराव माने देशमुख, माजी व्हा. चेअरमन प्रकाश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन नितीन राजे निंबाळकर, सहकार महर्षी चे संचालक जयदिप एकतपुरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, विश्वतेजसिंह मोहिते पाटील,जि. प. सदस्य राहुलबापू वाघमोडे, अरुण तोडकर, पं. स. सदस्य मानसिंग मोहिते, ,माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, माजी उपसभापती प्रतापराव पाटील, माजी जि प सदस्य बबन गायकवाड,लक्ष्मण पवार, माजी पंचायत समिती सदस्य ओंकार माने देशमुख , माजी उपसभापती कुचेकर आबा , माजी जि प सदस्य मधुकर पाटील, हनुमंत पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बोलताना सांगितले की, आपल्या कारखान्याची निव्वळ FRP रक्कम रु 2442 प्रतिटन असतानाही सभासद ऊस उत्पादकांना जास्तीत दर देण्याच्या हेतुने FRP पेक्षा रक्कम रुपये 458 प्रतिटन एवढा जास्त दर दिला असुन शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्यास गाळापस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
तसेच 265 या जातीपेक्षा ८६०२ या जातीच्या उसाचे लागवड करण्यास सभासद ऊस उत्पादकांनी प्राधान्य देणे गरजेचे असून उसाचा उतारा वाढल्यास त्याचा प्रत्यक्ष फायदा सभासद ऊस उत्पादकांना होणार असलेचे चेअरमन आ. रणजितदादांनी सांगितले
कृष्णाभीमा स्थिरीकरण योजनेची गरज व त्याचे महत्त्व त्यांनी उपस्थितांना पटवून सांगितले.
उजनी धरणाचे पाणी हे पाणी वापर संस्था स्थापन करून आरक्षित करणे व सदर पाण्यावर हक्क प्रस्थापित करणे गरजेचे असलेचे चेअरमननी सांगितले.
सभेतील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.
तसेच यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन मिलिंद कुलकर्णी यांनी सभेचे प्रास्ताविक केले, तर सभेचे अहवाल व विषय वाचन कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख यांनी केले व आभार संचालक शिवाजी गोरे यांनी मानले.
यावेळी सहकार महर्षि कारखान्याचे संचालक, श्री शंकर सहकारी चे संचालक, शिवामृत दुध संघांचे संचालक, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक,खरेदी विक्री संघाचे संचालक, जि. प. सदस्य व पं. स. सदस्य, सरपंच, उपसरपंच, शेतकरी सभासद, व्यापारी, ग्रामस्थ, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



0 टिप्पण्या