रत्नत्रय पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी वातावरणात संपन्न 🔵 सभासदांना 15 टक्के लाभांश मिळणार

 


🟡 रत्नत्रय पतसंस्थेची 21 वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळी वातावरणात संपन्न

 🔵 सभासदांना 15 टक्के लाभांश मिळणार 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे,  

मुंबई दिनांक 28/09/2025 :

 रत्नत्रय पतसंस्थेस सन २०२४ २५ या आर्थिक वर्षात 32 लाख 67 हजार 489 रुपये निव्वळ नफा झाला असून सभासदांना या वर्षी पंधरा टक्के लाभांश वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक अनंतलाल रतनचंद दोशी यांनी 21 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलताना दिली. 

 यावेळी संस्थेचे चेअरमन विरकुमार दोशी,  व्हॉइस चेअरमन डॉक्टर निवास गांधी, संचालक  प्रमोद दोशी, अजय गांधी,रामदास गोफणे, जगदीश राजमाने,सोमनाथ राऊत, विलास साळुंखे,अनघा गांधी,सचिव ज्ञानेश राऊत यांचे सह सभासद उपस्थित होते. 

  कार्यक्रमाची सुरुवात भगवान महावीरांच्या व तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील व आक्का साहेब यांच्या प्रतिमेचे पूजनाने करण्यात आली. पुढे बोलताना अनंतलाल दोशी म्हणाले या पतसंस्थेची  स्थापना परिसरातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांना सुलभ रीतीने कर्ज मिळावे त्याची उन्नती व्हावी या उद्देशाने करण्यात आले असून या संस्थेच्या प्रगतीस सर्व सभासद ठेवेदार संचालक व कर्मचारी वर्ग यांचा मोठा सहभाग असून ही पतसंस्था सगळ्यांना चांगली सेवा देती आहे. आर्थिक व्यवहाराबरोबरच ही संस्था अनेक सामाजिक कार्य ही करत आहे.

 

प्रास्ताविक संस्थेचे कर्तव्यदक्ष संचालक प्रमोद अनंतलाल दोशी यांनी केले. त्यांनी सांगितले की संस्थेमार्फत सभासदांसाठी भारतात कुठेही आरटीजीएस एनएफटी ची सोय, डीडी काढण्याची सोय, क्यू आर कोड पेमेंटचे सोय, पिग्मी तसेच लखपती मासिक व्याज ठेव अशा विविध सोयी संस्थेमार्फत सभासदांसाठी चालू  केलेल्या आहेत. तरी या सर्व सेवेंचा लाभ सभासदांनी  व ठेवीदारांनी घ्यावा असे यावेळी त्यांनी सांगितले. 

   संस्थेचा अहवाल वाचन चेअरमन विरकुमार अनंतलाल दोशी यांनी केले व संस्थेची स्थापना व तिचे उद्दिष्ट काय आहेत हे त्यांनी सांगून  संस्थेची चालू वर्षाची आकडेवारी सभासद समोर मांडली 31 मार्च 2025 अखेर संस्थेकडे 23 कोटी 57 लाख रुपये ठेवी असून कर्जवाटप 19 कोटी 15 लाख रुपये केले आहे. तसेच संस्थेची गुंतवणूक 9 कोटी 97 लाख रुपये इतकी आहे. संस्थेची एकूण वसूल विभाग भांडवल 48 लाख 84 हजार रुपये आहे तसेच संस्थेचे एकूण उत्पन्न 2 कोटी 92 लाख रुपये असून खर्च 2 कोटी 59 लाख रुपये झाला. संस्थेला चालू वर्षाचा नफा 32 लाख 67 हजार रुपये झालेला आहे व संस्थेचे या वर्षीचे ऑडिट शशांक पत्की अँड असोसिएट सोलापूर यांनी केले असून संस्थेला त्यांनी 'अ ' वर्ग दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.   

 संस्थेचे सचिव ज्ञानेश राऊत यांनी 21व्या वार्षिक सभेचे नऊ विषयाचे वाचन करून संस्थेच्या आर्थिक पत्रकाची माहिती दिली व सर्व विषयावर सविस्तर चर्चा करून सर्व ठराव बहुमताने मंजूर करण्यात आले...

 त्यानंतर संस्थेचे सभासद शिवाजी मदने, पंकज पानसरे व भगवान शिंदे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून त्यांनी यावेळी संस्थेच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले.  

 तसेच सालाबाद प्रमाणे याही वर्षी वेळेवर येणाऱ्या सभासदांमधून लकी ड्रॉ काढण्यात आले यामध्ये प्रथम क्रमांक सुभाष ओवाळ, द्वितीय क्रमांक सीमा गुरव, तृतीय क्रमांक शिवाजी मदने यांना अनुक्रमे बक्षिसे लागली. तसेच सर्व हजर सभासदांना देखील गिफ्ट देण्यात आले व त्यानंतर सर्व सभासदांना स्वादिष्ट जेवणाची सोय करण्यात आली होती यावेळी मोठ्या संख्येने  सभासद उपस्थित होते. 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  सौ.अमृता मोहिते  यांनी केले तर आभार प्रदर्शन जगदीश राजमाने यांनी मानले सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्थेचे कर्मचारी व पिग्मी  एजंट यांनी मोलाचे सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या