🅾️ खालिद का शिवाजी चित्रपट निमित्ताने
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 4/8/2025 : शिवरायांच्या सैन्यातील कथित मुस्लिम सैन्यावर महाराष्ट्रात चर्चा व्हावी. महाराष्ट्रात आता राज मोरे दिग्दर्शित "खालिद का शिवाजी" चित्रपट प्रदर्शित होणार आहे सदर चित्रपटात शिवरायांच्या सैन्यात ३५ टक्के मुस्लिम होते, शिवरायांनी रायगडावर मस्जिद बांधली होती.शिवरायांचे ११ अंगरक्षक मुस्लिम होते.असे खोटे नरेटीव्ह प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. या पूर्वी सुद्धा गेल्या दोन तीन दशका पासून अनेक विचारजंत आणि सेक्युलर पोंगापंडीतानी असाच बिनबुडाचा इतिहास प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांनी तेव्हा आणि आजही कोणताही समकालीन पुरावा सादर केला नाही.त्यामुळे शिवरायांच्या सैन्यातील कथित मुस्लिम सैन्यावर भाष्य करून चर्चा आवश्यक आहे.महाराष्ट्रात गेल्या तीन दशकापासून शिवकालीन इतिहासाची मोडतोड करुन विकृतिकरण सुरु आहे महाराष्ट्राता मधील काही बाजारू विचारवंत तथा स्वंयघोषित विचारवंत मंडळी सामाजात धादांत खोटया शिवकालीन इतिहासाची मांडणी करीत आहेत.शिवरायांचा सेनापती पासून वकील मुस्लिम होते, स्वराज्यची राजधानी असलेल्या किल्ले रायगढ़वर मस्जिद बांधली होती, त्यांनी कुराण सुद्धा वाचले होते.बाबा याकूत यांना शिवरायांचा गुरु स्थानी बसविण्याचा अट्टाहास करणारे भाष्य अनेक वेळा केले आहेत. धर्माधं औरंगजेब क्रूर नव्हता.औरंगजेब, अफजलखान होता म्हणून शिवराय आहेत असा चुकीचे आणि तर्कसंगत नसलेली भन्नाट वक्तव्ये सुध्दा केली गेलेली आहेत.आता सुध्दा"खालिद का शिवाजी" चित्रपटात शिवरायांच्या सैन्यात प्रचंड मुस्लिम सैन्य होते हा सर्वात खोटा दिशाभूल करणारा इतिहास ठासुन सांगतीला गेला.त्यामुळेच "खालिद का शिवाजी"चित्रपटातील वादग्रस्त सादरीकरण आणि एकेरी उल्लेखाची शासनाने गांभीर्याने दखल घेण्याची आवश्यकता असल्याची शिवभक्तांची मागणी येत आहे. शिवरायांच्या सैन्यात घोडदल व पायदल मध्ये मुस्लिमाची प्रचंड मोठी संख्या व शिवरायांचे सेनापती व ईतर सहकारी मुस्लिम असल्याचा खोटा नरेटिव्ह काही बाजारू विचारवंताच्या टोळ्या समाजात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत.ते का करीत आहे किंवा कशा साठी करीत आहेत लक्षात येत नाही पण षड्यंत्र असल्याचे स्पष्ट लक्षात येत.देशातील विविध भागात सुध्दा हा नरेटिव्ह मांडल्या जात आहे ओवेसी पासून गल्लीबोळातील गावठी स्वयंघोषित इतिहास तज्ञ समाजात खोटा इतिहासा समाजामध्ये प्रस्थापित करण्याचा करीत आहेत . महाराष्ट्रातील शिवकालीन इतिहास आपला गौरवशाली इतिहास असून तो रक्ताने लिहिलेला इतिहास आहे.त्याचे मोडतोड किंवा विकृतिकरण होऊ नये पण ठरवून काही बाजारू विचारवंत व नकली इतिहासकारांच्या टोळया खुशाल शिवकालीन इतिहासाची मोडतोड करुन चुकीचा व दिशाभूल करणारा खोटा इतिहास समाजात प्रस्तुत करीत आहेत. शिवरायांच्या सैन्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम सैनिक होते असा त्यांचा नेहमीचाच अजेंडा असतो पण कोणताही ऐतिहासिक पुरावा न मांडता कपोलकल्पित खोटा व निराधार इतिहास ही मंडळी मांडत असतात.पहीले ही संख्या 400 सांगण्यात आली नंतर हिच संख्या 700 झाली आता हळू हळू मुस्लिम सैन्य संख्या संख्या वाढत आहे. ज्या प्रमाणे मुस्लिम सैन्य संख्या वाढली त्याच प्रमाणे श्री शिवराज्याभिषेक चित्रा मध्ये मुस्लिम संख्या वाढत आहे.कोणी म्हणतात शिवरायांच्या सैन्यात ५० टक्के सैन्य मुस्लिम होते कोणी ५७ टक्के मुस्लिम घोडदळ सैनिक असल्याचे सांगुन आश्चर्यजनक दावे करतात. आता सुद्धा खालिद का शिवाजी मध्ये तोच खोटा इतिहास प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक शिवरायांच्या सैन्यात जवळपास पायदळ सैन्य संख्या एक लक्ष होती तर एक लक्ष पाच हजार घोडदळ सैन्य होते. घोडदळाचे दोन विभाग होते बारगीर व शिलेदार ज्याचे स्वत:चे घोडे असत त्यास शिलेदार व ज्याला स्वराज्या मधुन घोडे मिळत त्यास बारगीर म्हणत 45 हजार बारगीर व 60 हजार शिलेदार घोडेस्वार होते शिवरायांच्या सैन्यात पायदळ व घोडदळ तसेच 280 गडकोटवरील प्रशासनातील हवालदार,किल्लेदार सबनीस, कारखानीस ईतर कारागीर यांची एकूण संख्या जवळपास 2 लक्ष 50 हजार होती त्यांना स्वराज्य मधुन वेतन सुद्धा मिळत असे त्यामुळे शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिम प्रमाण सांगून शिवभक्तांची किती मोठी दिशाभूल केली जात असल्याचे लक्षात येते. वास्तविक पाहता शिवरायांच्या सैन्यात केवळ बोटावर मोजण्या इतकेच मुस्लिम सैनिक होते कोणत्याही बखरी किंवा कोणताही इतिहास तपसला जर हेच सत्य बाहेर येईल. इतिहास संशोधक गजानन मेहंदळे यांनी संशोधन केल्या प्रमाणे शिवरायांच्या सैन्यात बोटावर मोजण्या इतके मुस्लिम सैनिक होते. अफजलखानाचा कोथळा काढला तेव्हा त्यांच्या सोबत असलेल्या सिद्दी इब्राहीम यांच्या सरख्यांचे योगदान कोणताही शिवभक्त अमान्य करीत नाहीत. शिवरायांच्या सैन्यात प्रचंड प्रमाणात मुस्लिम सैन्य होते आणि मुस्लिम सैन्याचे प्रमाणाचा इतिहास हा कोणताही मुस्लिम महाराष्ट्रात सांगत नाही किंवा उल्लेखही करीत नाही.मग खोटा इतिहास सांगणारे कोण आहेत ? तर खोटा इतिहास सांगणारे सर्व हिंदू असून आमदार अमोल मिटकरी पासून आमदार जितेंद्र आव्हाड आघाडीवर आहेत चित्रपट दिग्दर्शक राजा मोरे यांनी सुद्धा तोच प्रकार चालविला असून खोटा इतिहास सांगण्याची त्यांच्या मध्ये स्पर्धा सुध्दा लागली आहे.उस्मान शेख व सुभान अली यांच्या व्यतिरिक्त हा इतिहास मुस्लिम विचारवंत का सांगत नाहीत.तसेच शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम असतील तर चांगली बाब आहे परंतू शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सहभागाचा इतिहास मुस्लिम समाजाला मान्य आहे का ? हा प्रश्न किंवा मुद्दा "खालिद का शिवाजी "चित्रपटाच्या निमित्ताने चर्चित करणे सुद्धा आवश्यक आहे. छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे नव्हे संपूर्ण देशाचे श्रध्दास्थान आहे ते कोण्याही एका जातीपातीचे नाहीत किंवा त्यांच्यावर कोणत्याही एका विशष्ट समाज किंवा राजकीय पक्ष यांची मक्तेदारी किंवा ठेकेदारी सुद्धा नाही. त्यामुळेच शिवकालीन इतिहासाचे खोटे नरेटीव्ह सादर करून विकृतिकरण होऊ नये तसेच होत असेल तर असे षढयंत्र हाणून पाडले पहिजे चित्रपट व प्रबोधनाच्या गोंडस नावा खाली जी दिशाभूल करण्याचा जो प्रकार सुरू आहे तो बंद पाडला पाहीजे."खालिद का शिवाजी" चित्रपटात शिवरायांच्या सैन्यातील कथित मुस्लिम सैन्यावर जे वादग्रस्त चित्रण आणि एकेरी उल्लेखाची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन लक्ष घालण्याची आवश्यकता आहे अशोक राणे, अकोला भ्रम.9423658385
0 टिप्पण्या