✳️ "शेतकरी कर्जमुक्ती साठी दोन ऑक्टोबरला मंत्रालयात घुसून शेतकरी आंदोलन करतील," बच्चू कडू यांचा आंबेठाणमध्ये प्रहार ❇️ "युद्धात जेवढे जवान शहीद झाले नाहीत त्यापेक्षा जास्त जण सरकारच्या व्यवस्थेने मारले" ✅ "नऊ तारखेला आम्ही वेदनांचा धागा बांधतोय" 🟩 श्रद्धेय शरद जोशी यांनी लिहिलेली संघटनेची शपथ


✳️ "शेतकरी कर्जमुक्ती साठी दोन ऑक्टोबरला मंत्रालयात घुसून शेतकरी आंदोलन करतील," बच्चू कडू यांचा आंबेठाणमध्ये प्रहार

❇️ "युद्धात जेवढे जवान शहीद झाले नाहीत  त्यापेक्षा जास्त जण सरकारच्या व्यवस्थेने मारले"

✅ "नऊ तारखेला आम्ही वेदनांचा धागा बांधतोय"

🟩 श्रद्धेय शरद जोशी यांनी लिहिलेली संघटनेची शपथ

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 8/8/2025 : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होत नाही तोपर्यंत सत्तेतल्या कोणत्याही राजकीय पक्षाला आम्ही मतदान करणार नाही एवढे जरी शेतकऱ्यांनी ठणकावून सांगितले तरी सरकार आणि सत्तेतील नेते गुडघे टेकत शेतकऱ्यांकडे येतील असे परखड मत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष, समविचारी संघटनेचे समन्वयक माजी मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आंबेठाण तालुका खेड येथे बोलताना व्यक्त केले.

शेतकरी संघटनेचे संस्थापक स्वर्गीय शरद जोशी यांचे निवास स्मारकस्थळी शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार महासंघ फाउंडेशन शेतकरी संघटना व अन्य समविचारी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आंबेठाण येथे आयोजित पहिल्या शेतकरी परिषदेत बच्चूभाऊ कडू बोलत होते.

तत्पूर्वी त्यांनी स्व. शरद जोशी यांच्या शेतकरी संघटनेचे हृदयस्थान असलेल्या शरद जोशी यांच्या आंबेठाण येथील गृह वास्तु स्मारकाला भेट देऊन त्या भूमीची माती कपाळाला लावली व त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. घराची आणि परिसराची दुर्दशा पाहून त्यांनी खंत व्यक्त केली. पुढील काळात सर्वांना एकत्रित आणून त्यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सरकारपेक्षा आम्हा लोकांची मानसिकता खराब आहे. आम्हाला एक दिवस सुद्धा स्मृतीस्थळी जाऊन श्रमदान करावे असे वाटत नाही ही शेरमेची बाब आहे. स्मारक उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बच्चू कडू यांनी यावेळी आश्वासन दिले. या कार्यक्रमास ज्येष्ठ शेतकरी नेते शामराव पवार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार, प्रदेश उपाध्यक्ष नंदकिशोर लोखंडे पाटील, मा. पोलीस पाटील संतोष मांडेकर, अनिल भांडवलकर, बाळासाहेब वर्पे, गीताताई मांडेकर, राजश्रीताई गायकवाड, कांचन मांडेकर, सुभाष पवळे, बाळासाहेब दौंडकर, राजाराम मोडवे, दीपक फाळके, यशवंत बांगर, दिलीप वर्पे पाटील, महेश बडे सर, प्रहार चे पुणे जिल्हा अध्यक्ष एडवोकेट वाळके पाटील, बबनराव बाठे, प्रहार चे अध्यक्ष विष्णुपंत गुंडाळ पाटील हनुमंत विठ्ठल दवणे माजी सरपंच दत्तात्रेय मांडेकर, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे पदाधिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चाकणची वाहतूक कोंडी

दरम्यान कार्यक्रमाला येताना चाकणच्या वाहतूक कोंडीमुळे उशीर झाल्याचं सांगताना बच्चू कडू यांनी पुण्यातून चालत आलो असतो तरी कदाचित लवकर आलो असतो असे मिश्किल वक्तव्य करून चाकणच्या वाहतूक कोंडी बद्दल तीव्र नाराजी दर्शवत चाकणच्या वाहतूक कोंडीबाबत सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उभे केले.

सरकारने मागण्या मान्य केले नाही तर 2 ऑक्टोबर रोजी आंदोलन करणार असल्याचा इशारा देत हे दखलपात्र आंदोलन राहणार आहे. आत्तापर्यंत आम्ही गांधीगिरी मार्गाने आंदोलने केली आतापर्यंत सरकारला वेळ देत गेलो आहे.

लाडकी बहीण योजना ही मतांसाठी केलेली योजना होती 

 लाडक्या बहिणीला समिती नाही नेमली ज्या बहिणींना गरज नव्हती त्या बहिणींनी लाभ घेतला. लाडकी बहीण योजना ही मतांसाठी केलेली योजना होती आणि आमची योजना ही वेदना थांबवण्यासाठीची योजना आहे. 

 नऊ तारखेला आम्ही वेदनांचा धागा बांधतोय

उन्नत महाराष्ट्राचा नारा मागत असताना सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. मुख्यमंत्र्यांना काहीतरी वाटली पाहिजे. रोज हार तुरे घेत असताना दररोज दहा ते पंधरा शेतकरी आत्महत्या करतात  आणि ते इकडे मौज मजा करतात. शरद जोशी यांच्या स्मृतिस्थळावरून मुख्यमंत्र्यांना संदेश देतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत सहा महिन्यात बाराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. युद्धात जेवढे जवान शहीद झाले नाहीत  त्यापेक्षा जास्त जण सरकारच्या व्यवस्थेने मारले असा घणागात त्यांनी यावेळेस लगावला. एखादा नेता मेला की दुःख पाळतो. मात्र देशात साडेसहा लाख शेतकरी यांनी आत्महत्या केल्या तरी एक दिवस श्रद्धांजली नाही. आणि म्हणून नऊ तारखेला आम्ही वेदनांचा धागा बांधतोय ह्या वेदना सरकारला कळायला पाहिजे असेही ते म्हणाले. सरकारने जातीपाती धर्मात गुंतून ठेवले ओबीसी मराठा अशा जातीपातीत गुंतून ठेवले आहे. जायचे होते दिल्लीला पण या सगळ्या राजकारण्यांनी आम्हाला कलकत्त्याला पाठवलं असा मिस्कील टोला त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्याला लगावला. 

यावेळी आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या स्मरणार्थ राखी पौर्णिमेनिमित्त काळी राखी बांधून शहीद शेतकऱ्यांना आदरांजली वाहण्यात येणार असल्याचे यावेळी कडू यांनी सांगितले. आंबेठाण येथील शरद जोशी यांची वास्तू तसेच शेतकरी प्रशिक्षण केंद्र उर्वरित शेत जमीन याची पाहणी विठ्ठल राजे पवार यांच्या उपस्थितीत केली. यावेळी पवार यांनी बच्चुभाऊ कडू यांना सर्व परिसर व त्या ठिकाणची माहिती दिली तसेच शरद जोशी यांचे जुने सहकारी शामराव पवार नंदकुमार लोखंडे तसेच प्रशिक्षण स्थळावर सुरेश म्हात्रे  यांच्याशी चर्चा घडवून आणत प्रशिक्षण तळावर शरद जोशी यांनी पूर्वी केलेल्या विविध आंदोलनाची क्षणचित्रे याची पाहणी बच्चू कडू पाहणी केली. 

यावेळी प्रास्ताविकात माहिती देताना विठ्ठल राजे पवार यांनी सांगितले की सरकार शेतकऱ्यांनी पिकवलेल्या सर्व प्रकारच्या शेतमालाला बेसरेट गॅरंटी हमीभाव एम एस पी सह केंद्र सरकारने 20 टक्के बोनस देणार अशी घोषणा केली होती.तसेच शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती करण्याचेही आश्वासन फडणवीस व मोदी सरकारने दिले होते. मात्र त्यांनी कोणतीच पूर्तता केलेली नसल्याने माननीय नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरुवातीला अन्नत्याग आंदोलन सात दिवस त्यानंतर सात दिवस पदयात्रा 24 जुलै चा महाराष्ट्रातला सर्वात मोठा चक्काजाम त्यानंतर आता सुरू असलेल्या चौथ्या टप्प्यातील पाच शेतकरी हक्क परिषदा घेत आहोत. त्यातली पहिली शेतकरी हक्क परिषद आज सात ऑगस्ट रोजी शरद जोशी यांच्या स्थापन केलेल्या संघटनेच्या कार्यस्थळ आंबेटठाण पासून करत आहोत. त्यानंतर पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर आणि शेवटची शेतकरी हक्क परिषद मुंबई येथे होणार असल्याचे विठ्ठल राजे पवार यांनी सांगितले आणि तदनंतरही सरकारने शेतकरी कर्जमुक्तीचा इतर मागण्याच्या संदर्भात नोटिफिकेशन जाहीर करत मागण्या पूर्ण केल्या नाही तर 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी महाराष्ट्रातील जागा झालेला तमाम कष्टकरी कामगार शेतकरी भगतसिंग यांच्या मार्गाने मंत्रालयात घुसून माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे. यावेळी संतोष मांडेकर यांनी आंबेठाण गावच्या वतीने विचार मांडले तसेच नंदू पाटील लोखंडे व संघटनेचे ज्येष्ठ नेते शामराव पवार यांनी बच्चुभाऊ कडू यांना लिहिलेले अनावृत पत्र वाचून आपले विचार मांडले, संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वर्पे पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे नंतर उपस्थित प्रमुख पाहुणे तसेच पदाधिकारी यांना शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ फाउंडेशन संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नेते प्रदेश कार्याध्यक्ष व राष्ट्रीय सल्लागार शामराव पवार यांचे हॉटेल पॅराडाईज येथे धार संस्थान शामराव राजे पवारप परिवार यांच्या वतीने करण्यात आली होती.

शेतकरी संघटनेची शपथ

पहिल्या शेतकरी हक्क परिषदेला शेतकरी संघटनेची शपथ घेऊन सुरुवात झाली. प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी संघटनेचा बिल्ला लावून शपथ घेतली. शरद जोशी यांनी लिहिलेली संघटनेची शपथ संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी उपस्थित शेकडो शेतकरी कष्टकरी कामगार यांना दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या