श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर चांदज येथे भव्यतेने अग्नीहोम सोहळा संपन्न

 

श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर चांदज

येथे भव्यतेने अग्नीहोम सोहळा संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 5/8/2025 : श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर चांदज तालुका माढा जिल्हा सोलापूर येथे श्रावण महिन्यातील सोमवार निमित्त सालाबाद प्रमाणे अग्निहोम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अग्निहोमानिमित्त श्री शांतवन, धुनी प्रज्वलन, अग्निहोम प्रज्वलन महाप्रसाद पंगत, श्री सोमनाथ विनवण्या, देवी गीते, तांडव नृत्य, संचारवाणी आणि संकट निवारण इत्यादी भरगच्च धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. 

पृथ्वीच्या पाठीवरील सहावी काशी स्थानकाचे मुख्य मानाचे सर्व ज्येष्ठ प्रचारक भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांच्या शुभहस्ते मानाचे श्री शांतवन श्री सोमनाथ महात्म्य ग्रंथ पारायणा सह होऊन अग्निहोम पूजा व प्रज्वलन करण्यात आले. यावेळी बावडा येथील श्री सोमनाथ दरबाराचे प्रमुख अशोक सिताराम सरवदे महाराज, गणेशगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील सोमनाथ मंदिराचे सर्वे सर्वा दिगंबर सिताराम बाबर महाराज, श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर चांदजचे स्थानिक महाराज आकाश भिमराव लोंढे महाराज, एक नंबर भक्त भीमराव खंडू लोंढे, दीपक बाबर महाराज भाळवणी सोमेश्वर दरबार, सोमेश्वर भजन मंडळ किसन महाराज तांदळवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, दादा धाडुरे महाराज सोमेश्वर दरबार तांदळवाडी, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर, सोमेश्वर विनवणी रचनाकार, गीतकार दिलीप लोखंडे, बोडरे महाराज, तसेच धीरज भिमराव लोंढे, राजरत्न लोंढे, सागर अर्जुन लोंढे इत्यादींसह अनेक मान्यवर भावीक भक्त उपस्थित होते. 

सोमवार दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजले पासून सुरू झालेल्या श्रावण मासातील या धार्मिक सोहळ्यासाठी  कुलदीप शिवाजी पाटील चांदज, गणेश हेगडकर, डॉक्टर नितीन पाडुळे, प्रशांत शिवाजी गाडे, रामदास हेगडकर,   दरबारी शिष्यवर्ग, कविता जाधव राहणार उरळी कांचन, रेशमा गायकवाड मिटकलवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर, किरण नाईकनवरे पिराची कुरोवली तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर, शरद कोळपे. पांडुरंग कांबळे, समाधान गायकवाड, रामभाऊ पवार गारअकुले, मयूर गायकवाड, रंजीत जाधव, महेश घोडके, नागेश काटे, राजेंद्र महाराज कुरवली, दादा डावरे, अक्षय डावरे,  नवनाथ लोंढे, योगेश नाईकनवरे, गणेश नाईकनवरे, यांच्यासह असंख्य भाविक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या