🟨 सदगुरू गहिनीनाथ अर्बन को ऑप बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न
✳️ सभासदांना १०% लाभांश वाटप
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 6/8/2025 : अकलूज तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील अग्रगण्य असलेल्या सदगुरू गहिनीनाथ अर्बन को ऑप बँकेची २८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट2025 रोजी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
सौभाग्य मंगल कार्यालय माळीनगर येथे पार पडलेल्या सभेच्या प्रारंभी बँकेचे सभासद व पत्रकार मिलिंद गिरमे यांनी गहिनीनाथ महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी बँकेचे व्हाईस चेअरमन ॲड. शिरीष ताराचंद फडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि, मी सर्व सभासदांना विश्वास देतो कि, आपल्या बँकेला राज्यातच नव्हे तर देशातही अग्रगण्य बँक बनवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्नशिल राहू. आपण आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे . त्याला आम्ही योग्य ठरवू आणि आपल्या हितासाठी पारदर्शकतेने आणि जबाबदारीने कार्य करत राहू. बँकेस चालु वर्षी रू. ३६.५७ लाख इतका नफा झाला असून १०% लाभांश जाहिर करण्यात आला. संस्थेच्या रू. ३८.१४ कोटी इतक्या ठेवी असून रू.२०.४४ कोटी इतके कर्ज वाटप केले आहे . संस्थेचा नेट एन. पी .ए.0% आहे . याप्रसंगी संस्थेचे संचालक ॲड. संजय दोशी यांनी सर्व ठेवीदार व सभासद यांना विश्वास दिला कि, बँकेच्या प्रगतीचा आलेख असाच उंचावत राहिल. यासाठी सर्व संचालक मंडळ प्रामाणिक व पारदर्शकपणे काम करत राहिल. तसेच बँकेचे सभासद महादेव बंडगर यांनी बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करून संस्थेचे सर्व संचालक, कर्मचारी व पिग्मी एजंट यांनी केलेल्या कार्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार गोरे यांनी सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली . या वार्षिक सभेस बँकेचे व्हाईस चेअरमन ॲड. शिरिष ताराचंद फडे बँकेचे संचालक. अजित गांधी, सन्मती सोनाज, डॉ. विठ्ठल कवितके, ॲड. संजय दोशी, डॉ. मिलिंद खाडे, भरतेश वैदय, निलेश गिरमे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार गोरे, मॅनेजर मनोज मंगरूळे व सर्व कर्मचारी व पिग्मी एजेंट उपस्थित होते. कार्यक्रमाचे अहवाल वाचन बँकेचे सिनिअर अधिकारी संजय कुलकर्णी यांनी केले .

0 टिप्पण्या