❇️ पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी

❇️ पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 7/8/2025 : पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी २९ लाख (ग्रामीण) ते ५० लाख (शहरी) पर्यंत गुंतवणूक लागते, पण रोज १९-१५ हजार रुपये निव्वळ नफा शक्य आहे. इंडियन ऑइल, बीपीसीएल, एचपीसीएल किंवा रिलायन्सकडून डीलरशिप घ्यावी लागते. अर्जदार भारतीय, २१-६० वयोगटातील असावा आणि मुख्य रस्त्यावर योग्य जागा (८००-१६०० चौ.मी.) असावी. दिल्ली सारख्या शहरात प्रत्येक लीटर पेट्रोलवर पंप मालकाला ४.३९ रुपये आणि डिझेलवर ३.०२ रुपये कमिशन मिळते. रोजच्या विक्रीवर महिन्याला लाखोंची कमाई शक्य होते.

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी खर्च

ग्रामीण भागात सुरू करण्यासाठी किमान २० लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक असते. शहरात हा खर्च ४० ते ५० लाख रुपये होऊ शकतो. या खर्चात परवाना, टाक्या, डिस्पेंसर, आवश्यक पायाभूत सुविधा यांचा समावेश होतो. शिवाय, जमिनीची किंमत स्थानिक दरानुसार ठरते आणि तीही एकूण खर्चावर मोठा परिणाम करते. बँकांकडून यासाठी २ कोटी रुपये कर्ज मिळू शकते.

पात्रता

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी अर्जदार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे, आणि त्याचे वय २१ ते ६० वर्षांच्या दरम्यान असावे. स्वतःची जमीन किंवा दीर्घकालीन (१५-२५ वर्षांची) भाडेपट्टीवरील जमीन असणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागात १२०० ते १६०० चौ.मी. तर शहरात ८०० ते १२०० चौ.मी. जागा आवश्यक आहे. जमीन मुख्य रस्त्यावर, वर्दळीच्या भागात असावी.

परवाना कुठून मिळतो?

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून (OMC) डीलरशिप घ्यावी लागते. इंडियन ऑइल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL), रिलायन्स पेट्रोलियम यांसारख्या कंपन्या आपल्या वेबसाईटवर आणि वृत्तपत्रा मधून अर्ज प्रक्रिया जाहीर करतात. अधिक माहितीसाठी www.petrolpumpdealerchayan.in या वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे.

अर्ज करताना जमीन कागदपत्रे, आधार, पॅन, बँक स्टेटमेंट, जन्मतारीख प्रमाणपत्र (१०वी मार्कशीट किंवा पासपोर्ट) यांसारखी कागदपत्रे अपलोड करावी लागतात. अर्ज फी ८००० रुपये आणि SC/ST साठी २००० रुपये आहे. अनेक अर्जदार असल्यास लॉटरी किंवा बोली पध्दतीने निवड केली जाते. परवाना मिळाल्या नंतर स्थानिक प्रशासन, अग्निशमन विभाग आणि नगरपालिकेकडून मंजुरी घेऊन पंप बांधकाम करावे लागते. सरासरी ६ ते १२ महिने लागतात. पंप चालवण्यासाठी सुरुवातीला ८-१० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते.

पंप मालकांची कमाई

प्रत्येक लीटर पेट्रोल-डिझेलवर पंप मालकाला ठराविक कमिशन मिळते. उदाहरणार्थ, दिल्लीत १ लीटर पेट्रोलवर सध्या पंप मालकाला ४.३९ रुपये कमिशन मिळते. ९४.७७ रुपयांच्या पेट्रोल किमतीत बेस प्राइस ५२.८४ रुपये, केंद्राचा एक्साईज ड्युटी २१.९० रुपये, राज्याचा व्हॅट १५.४० रुपये आणि इतर शुल्कांचा यात समावेश आहे. जर एखादा पंप रोज ५००० लीटर पेट्रोल विकतो, तर २१,९५० रुपये कमिशन मिळते. त्यातील सुमारे ५०% खर्च गेला तरी दररोज १०,००० रुपयांचा नफा शक्य आहे. डिझेलसाठी, दिल्लीत १ लीटरवर पंप मालकाला सरासरी ३.०२ रुपये कमिशन मिळते. ५००० लीटर डिझेल विक्रीवर दररोज सुमारे १५,१०० रुपये कमिशन मिळते, ज्यातून ७,५०० रुपये निव्वळ नफा मिळतो. म्हणजेच, वर्दळीच्या भागात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून एका पंप मालकाला दररोज १५,००० रुपये निव्वळ कमाई होऊ शकते.

सौजन्य : दैनिक सकाळ

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या