🛑 मेंढ्या चोरीचा तपास करून गुन्हेगारांना कडक शासन करावे - संजय वाघमोडे 💢 विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांना यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन

 

🛑 मेंढ्या चोरीचा तपास करून गुन्हेगारांना कडक शासन करावे -   संजय वाघमोडे

💢 विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांना यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 4/8/2025 : कोल्हापूर जिल्ह्यात विशेषतः शिरोळ तालुक्यात मेंढ्या चोरांनी अक्षरशः थैमान घातले आहे. मेंढ्या चोरांना शिक्षा झाली नसल्याने व पोलिसांची भिती वाटत नसल्याने चोर निडर झाले आहेत. मेंढ्याचोरांचा तपास करून गुन्हेगारांना कडक शासन करावे. अशी मागणी निवेदनाद्वारे विशेष पोलीस महासंचालक कोल्हापूर व जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांच्याकडे यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केली. यावेळी कोल्हापूर जिल्हा संपर्कप्रमुख सुनील शेळके, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष (शहरी) हेमंत बोडके, जिल्हाध्यक्ष ग्रामीण आप्पाजी मेटकर, कोल्हापूर जिल्हा युवक अध्यक्ष अरुण फोंडे, शाहुवाडी तालुका युवक अध्यक्ष संजय डफडे, जिल्हा उपाध्यक्ष  दादासो गावडे, अमोल मेटकर , अमर पुजारी, ज्ञानदेव फाले, अनिल शेळके, दिपक जानकर, ज्ञानदेव काळे, शामा गावडे, गुंड बेडगे, रमेश बेडगे, युवराज बेडगे, विनोद बेडगे, तानाजी बिडगे, बाचू बेडगे, मंगेश बेडगे, अनुप बेडगे, धीरज बेडगे, अण्णाप्पा बेडगे, अण्णा गावडे, म्हळू गावडे, बापू मरळे,  इरगुंडा गावडे,  सागर गावडे, हिवरा बेडगे, तानाजी शेळके, इत्यादी उपस्थित होते.     

यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे कि गेल्या काही दिवसात जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत  उदगाव, तमदलगे, चिपरी, दानोळी,  इत्यादी  गावात  शेळ्यामेंढ्याची चोरी झाली आहे. त्याची रितसर तक्रार  पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. यापूर्वीही म्हणजे प्रत्येक वर्षी असा घडलेल्या १ ते ५ गुन्ह्यांची जयसिंगपूर , शिरोळ, कुरुंदवाड, पोलीस ठाण्यात जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यात ही यापूर्वी अशा तक्रारी  दाखल झालेल्या आहेत. परंतु यातील कोणत्याही  चोरी प्रकरणातील  गुन्हेगार  आजपर्यंत सापडलेले नाहीत व चोरीला गेलेल्या शेळ्या मेंढ्या मिळालेल्या नाहीत. किंवा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे आजपर्यंत एकाही शेळ्या मेंढ्या चोराला शिक्षा झालेली नसल्याने शेळ्या मेंढ्या चोरांच्यामध्ये पोलीस व कायद्याची भिती राहिली नाही. त्यामुळे गुन्हेगार निडर झाले आहेत. ते आत्ता १०- २० ते संपूर्ण   शेळ्या मेंढ्यांच्या कळपांचीच चोरी करून वाहनातून घेऊन जात आहेत. याबाबत संघटनेच्या माध्यमातून अनेक वेळा निवेदन ही देण्यात आलेली आहेत. 

       .गरीब मेंढपाळ भटकंती करून मेंढ्याच्या जीवावरच आपला संसाराचा गाडा चालवतात व त्यांचे संपूर्ण संसार शेळ्या-मेंढ्यांच्या उत्पन्नावर चालतात. मेंढ्याची चोरी झाल्याने मेंढपाळांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. 

   मेंढ्या चोरी प्रकरणात आपण लक्ष घालून आम्हास न्याय मिळवून द्यावा. अन्यथा यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने  आंदोलन करण्यात येईल. असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या