❇️ चले जाव चळवळ आणि रा.स्व. संघ
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 5/8/2025 : भारतीय स्वातंत्र्य लढयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान नव्हते किंवा स्वातंत्र लढ्यात संघाचा सहभाग नव्हता असा कांगावा देशातील पाखंडी टोळ्या नेहमी करीत असता त.तसेच काही तथाकथित पुरोगामी मंडळीच्या मायावी टोळ्या,स्वतंत्र दिवस१५ऑगस्ट व प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीचे औचित्य साधून संघ मुक्त भारत किंवा संघावर बंदी घालण्याच्या घोषणा सुद्धा देत असतात. किंवा केविलवाणा प्रयत्न करतात.तसेच देशात दि.९ औगस्ट क्रांती दिंनाला फार महत्व असून तो दिवस राष्ट्रीयसण म्हणून साजरा केला जातो.दि.९ ऑगस्ट ते १५ औगस्टच्या काळात स्वतंत्र लढ्यातील योद्धांचे स्मरण करण्यासाठी देशात देशभक्ती पर्व सप्ताह सुध्दा साजरा केला जातो. शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ तथा समाज प्रबोधन करणाऱ्या संस्था मध्ये देशभक्ती पर्वाचे युवक मेळावे घेतले जातात.देशातील सर्व वृत्त्तवाहिन्यावर चर्चासत्र घेतले जातात.वर्तमानपत्रात लेख सुद्धा प्रसिद्ध होत असतात. एकूणच शालेय विद्यार्थी वर्गापासून महाविद्यालयीन तरुणा समोर स्वतंत्र लढ्यातील वीर पुरुषांचे स्मरण केले जाते.पण याच देशभक्ती पर्वाच्या काळात संघ विरोधी मायावी टोळ्या, दुटप्पी सेक्युलर मंडळी,साहित्यिक, प्रसार माध्यमातील पत्रकारांच्या पाखंडी टोळ्या, व्हॉट्स ॲप युनिव्हर्सिटी मधील अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले पोंगापंडीत आणि राजकीय पक्ष सुध्दा भारतीय स्वतंत्र लढ्या मध्ये तथा वर्ष १९४२च्या"चले जाव "चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीच संबंध नव्हता असा कंगावा करून स्वतंत्र लढ्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे योगदान नाकारण्याचा करंटेपणा करतात किंवा स्वातंत्र लढ्यातील संघाच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. वास्तविक पाहता स्वातंत्र्य चळवळीत संघ संस्थापक डॉक्टर केशव बळीरामपंत हेडगेवार व संघाच्या स्वयंसेवकांनी संघाच्या सर्वानुमते ठरलेल्या धोरणा नुसार संस्थात्मक नव्हे तर व्यक्तिशः मोठ्या हिरहिरीने सहभाग घेतला.वेळ प्रसंगी बलिदान सुद्धा केले आहे १९४२ च्या. चले चळवळ मध्ये संघाच्या स्वयंसेवकांनी बलिदान दिले आहे. चिमूर,आष्टी ,रामटेक,नंदुरबार येथे संघ स्वयंसेवकांनी चले जाव आंदोलन मध्ये सहभाग घेऊन बलिदान सुद्धा दिले आहे या सर्व घटनांचे पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत पण भारतीय दुटप्पी पत्रकार आणि इतिहासकरांनी त्याची दखल घेतलेली नाही. उलट संघाचा स्वतंत्र लढ्यात सहभाग नव्हता अशी सतत कोल्हेकुई केली आहे. राष्ट्रीय काँग्रेसने ऑगस्ट १९४२ मध्ये "करो की मरो घोषणा करीत"चले जाव चळवळ सुरू केली होती.दि. 8 औगस्ट 1942 ला मुंबईतील गोवालिया टॅंक येथून म .गांधीनी ब्रिटीशा विरुद्ध चलेजावची घोषणा केली त्याचे पडसाद देशात भारत छोडो आंदोलनाने उमटले कांग्रेस कार्यकर्त्याची धरपकड होऊन त्यांना तुरुंगात डांबण्यात आले होते.म.गांधी पासून प.नेहरू यांची तुरुंगात रवानगी झाली होती.भारत छोडो आंदोलनात संपूर्ण देश ब्रिटीशाविरुद्ध उभा ठाकला होता. जागोजागी चले जाव आंदोलनाने जोर पकडला लागला. संघाचे स्वयंसेवक चले जाव आंदोलन मध्ये जागोजागी सहभागी झाले होते ब्रिटिशांची गोळी छातीवर झेलणारा बालाजी रायपूरकर. देशात चले जाव चळवळ सुरू झाली तेव्हा चळवळीचे पडसाद विदर्भात उमटले विदर्भातील चिमुर जि.चंद्रपूर येथे दि.16 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटिश सरकार विरुद्ध चले जाव आंदोलनाला सुरुवात झाली वआंदोलन देशात फार गाजले संघाचे स्वंयसेवक,कांग्रेस सेवादल कार्यकर्ते व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच गुरुदेव सेवा मंडळ यांनी हे आंदोलन उभे केले होते त्याची दखल दि.17 ऑगस्ट रोजी बर्लिन नभोवानीने सुद्धा घेतलेली होती संघाचे अधिकारी दादा नाईक, बाबुराव बेगडे,अण्णाजी सिरास,कांग्रेसचे उद्धवराव कोरेकर संघ शाखेचे मुख्यशिक्षक माधवराव कठाणे यांचे नेतृत्वात चिमूरचा स्वातंत्र संग्राम लढला गेला याच चळवळी मध्ये विदर्भात ब्रिटिशांच्या बंदुकीची गोळी आपल्या छातीवर झेलनारा हुतात्मा बालाजी रायपूरकर हा संघाचा स्वयंसेवक होता या लढयात बालाजी रायपूरकर सह श्रीराम बिंगेवार,बाबूलाल झीरे,रामाजी बारापात्रे,उद्धवराव खेमसकर अशा पांच चिमूरकराना वीरगती प्राप्त झालेली आहे जवळपास 125 चिमूरकारांना बंदिस्त करण्यात येऊन 19 लोकाना फाशीची शिक्षा झाली काही काळा नंतर रद्द झाली ज्यामध्ये असंख्य संघाचे स्वयंसेवक होते चिमुरचा स्वातंत्र संग्राम घराघरा मधून लढला गेला असून दि.16 ते 19 ऑगस्ट तीन दिवस लढा चालला होता चिमूर च्या लढयात राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या स्वंयसेवकांचे योगदान फार महत्वाचे असून ते नाकारता येत नाही. रामटेक मधील आंदोलन देशात चले जाव चळवळ सुरू झाली तेव्हा संघाचे स्वयंसेवक अनेक ठिकाणी त्यामध्ये सहभागी झाले होते. चिमूर प्रमाणे अमरावती जिल्हा मधील आष्टी येथे चले जाव चळवळी ने जोर धरला होता.तसेच नागपूर जवळ असलेल्या रामटेक येथे सुध्दा झालेल्या आंदोलन मध्ये संघाचे स्वयंसेवक सहभागी झाले होते. रामटेक नगर कार्यवाह रमाकांत केशव उपाख्य बाळासाहेब देशपांडे यांनी आंदोलन मध्ये उडी घेतली आणि आंदोलन सुरू झाले. बाळासाहेब देशपांडे तेव्हा वकीली व्यवसाय करीत.हजोरोच्या संख्येने लोक रामटेक तहसील कार्यालयावर ब्रिटिश युनियन जॅक काढून तिरंगा ध्वज फडकविण्या साठी जमले आणि तिरंगा ध्वज फडकविला. पोलिसांनी बळाचा वापर करून गोळीबार करण्याचा प्रयत्न करीत असतांना बाळासाहेब देशपांडे यांनी हातात बंदूक घेतलेल्या पोलिसांच्या कंबरेला विळखा घालून गोळीबार होऊ दिला नाही.ब्रिटिश सरकारने बाळासाहेब देशपांडे यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरून तुरुंगात डांबले.तुरुंगात त्यांची विनोबा भावे आणि पंडित रविशंकर शुक्ला यांच्या सोबत ते तुरुंगात होते.बाळासाहेब देशपांडे यांना फाशीची शिक्षा सुनावली होती पण पुरव्याअभावी त्यांची सुटका झाली होती.पुढे बाळासाहेब देशपांडे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमचे संस्थापक तर प.शुक्ला मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री झाले होते.कांग्रेस ने पुकारलेल्या स्वतंत्र चळवळीत संघाचे स्वयंसेवक सहभागी होत असत त्यामुळे स्वातंत्र लढयात संघाचा सहभाग नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. प्रतिज्ञित स्वयंसेवक शशीधर केतकरांचे बलिदान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिज्ञित स्वयंसेवक शाशिधर केतकर यांनी स्वातंत्र्यसाठी बलिदान देऊन बलिदान करणाऱ्यांच्या रक्ता शिवाय स्वातंत्र्याचे मंदिर उभे राहत नाही हे वाक्य खरे करून दाखवले आहे.देशात जेव्हा भारत छोडो आंदोलन सुरू झाले तेव्हा देशाच्या विविध भागात पेट घेत होते तसेच मुंबई मध्येच आंदोलन सुरू झाल्याने महाराष्ट्रात त्यास विशेष महत्व होते.आंदोलन सुरू एक महिन्याचा कालावधी उलटला असताना सप्टेंबर महिन्यात नंदुरबार शहरात ब्रिटिश सरकार विरुध्द प्रचंड असंतोष खदखदत होता शाळकरी मुलांनी दि.९ सप्टेंबर १९४२ रोजी चले जाव आंदोलनास पाठिंबा व ब्रिटिश सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करून मोर्चा काढला होता"भारत माता की जय, वंदेमातरम " गगनभेदी घोषणा देत मोर्चा सरकारी कार्यालय जवळ येताच ब्रिटिश पोलिसांनी आंदोलन दडपण्यासाठी कठोर पावले उचलून अंधाधुंद लाठी चार्ज केला.शांततापूर्ण वातावरणात निघालेल्या मोर्चावर अचानक गोळीबार सुद्धा करण्यात आला. नंदूरबार मध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत शिरीषकुमार मेहता, धंपख्लाल वाणी,शाशिधर केतकर यांच्या सह आंदोलनातील इतरही कार्यकर्ते वीरमरण पावले त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिज्ञित स्वंयसेवक शाशिधर केतकर यांचा सुद्धा मृत्यु झाला होता. शाशिधर केतकर १९४२च्या'भारत छोडो- चले जाव"आंदोलनात सहभागी झालेले एक क्रांतिकारक होते.त्यांचे पूर्ण नाव शाशिधर लक्ष्मण केतकर असून ते नंदुरबारचे प्रतिज्ञित स्वयंसेवक होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हुतात्मा म्हणून त्यांचे नाव महाराष्ट्रात सन्मानाने घेतले जात असून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील त्या असंख्य ज्ञात-अज्ञात युवकांपैकी ते एक आहेत ज्यांनी आपले आयुष्य देशासाठी अर्पण केले. त्यांचे बलिदान युवकांमध्ये राष्ट्रभक्ती आणि त्याग याची प्रेरणा देणारे ठरते. संघाच्या कार्यपध्दती मध्ये पद्य हा देशभक्तीचा संस्कार असतो खालील पद्याची ओळ शशिधर केतकर यांनी तंतोतंत खरी करून दाखविली देश है पुकरता , पुकारती हैं भारती ! खून से तिलक करो और गोलीयों से आरती !! बलिदानी स्वयंसेवक देविपद चौधरी व जगपती कुमार भारतीय स्वातंत्र लढ्या मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकानी देशाच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. वर्ष १९४२ च्या "भारत छोडो" आंदोलन मध्ये सुद्धा सक्रिय सहभाग होता. देशात जेव्हा आंदोलन सुरू झाले तेव्हा संघ स्वयंसेवकांनी बिहार मधील पटणा, रामटेक आणि चिमूर कार्यालयावर तिरंगा ध्वज फडकविला होता.तिरंगा फडकवितांना संघ स्वयंसेवकांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलून वीर मरण स्वीकारल आहे. मुंबई मध्ये चले जाव चळवळ सुरू झाल्या नंतर देशाच्या विविध भागात आंदोलन सुरू झाले होते.दि.११ ऑगस्ट १९४२ रोजी बिहार मधील पटना शहरात भारत छोडो आंदोलन सुरू झाले तेव्हा स्थानिक तरुण युवकांनी पुढाकार आंदोलन केले "भारत माता की जय, वंदेमातरम" गगनभेदी घोषणा देत पाटणा शहरातील ब्रिटिश सरकारच्या साचिवालयावर (सेक्रेटेरियट) तिरंगा ध्वज फडकविला.चवताळलेल्या ब्रिटिश सरकार च्या पोलिसांनी आंदोलकावर अंधाधुंद लाठी चार्ज आणि गोळीबार केला होता.ब्रिटिश पोलिसांनी केलेल्या बळाच्या वापरा मुळे सहा युवकांना वीर मरण आले होते.देविपद चौधरी आणि जगपती कुमार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ता होते.वर्ष १९९७ मध्ये बिहार सरकारने शुर वीरांच्या स्मृती प्रित्यर्थ पटणा सचिवालय जवळच शहीद स्मारक निर्माण केले आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तत्कालीन क्षेत्र प्रचारक व विद्यमान सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या उपस्थिती भव्य दिव्य देशभक्तीचा कार्यक्रम संपन्न झाला होता. आता तरी संघ विरोधाचा करंटेपणा सोडा स्वातंत्र लढ्यातील उपरोक्त तिन्ही घटनांचा विचार केल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वंयसेवकांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग अधोरेखित होतो. तसेच संघाच्या स्वयंसेवकांनी असहकार आंदोलन,सायमन कमिशनला विरोध,मिठाचा अर्थात जंगल सत्याग्रह आणि चले जाव चळवळीत मोठ्या हिरहिरीने सहभाग घेतला होता त्यासाठी अनेक स्वयंसेवकांना कारावास सुध्दा झालेला आहे.आणि सर्व घटनांचे पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत. आपण जे काही करतो आहे ते राष्ट्रा साठी करत आहोत या उदात्त भावनेने संघ स्वयंसेवकानी स्वतंत्र लढ्यातील आपल्या सहभागाचा लेखाजोखा ठेवला नाही तसेच देश स्वतंत्र झाल्यावर सरकारी सुविधा व पेन्शन सुद्धा नाकारली आहे. परंतु संघ विरोधकांच्या पाखंडी टोळ्या सतत स्वातंत्र्य लढ्यात संघ आणि संघ स्वयंसेवकांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून थेट स्वातंत्र लढ्यात संघाचा सहभागच नव्हता असा खोटा प्रचार करून समाजाची दिशाभूल करीत असतात. आता ही त्यांची दिशाभूल किंवा खोटा प्रचार थांबवून आता तरी संघ विरोधाचा करंटेपणा सोडला पाहिजे. अशोक राणे,अकोला भ्र.९२३६५८३८५
0 टिप्पण्या