🟪 नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वेमंत्री  अश्विनी वैष्णव व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील भेट 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे.

मुंबई दिनांक 8/8/2025 :

आज नवी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भेट घेऊन मतदारसंघातील विविध  प्रलंबित रेल्वे प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करत निवेदन सादर केले. सदर निवेदनामध्ये ज्या पाच बाबींचा प्रामुख्याने उल्लेख आहे त्या पुढील प्रमाणे आहेत.

1. पंढरपूर - फलटण रेल्वेमार्गासाठी आवश्यक निधीची तातडीने उपलब्धता करावी, जेणेकरून या प्रकल्पास गती मिळेल.

2. जेऊर - आष्टी - चौंडी नवीन प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी ठोस पावले उचलावीत

3. पंढरपूर - देहू मेमू रेल्वे सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, ज्यामुळे वारकऱ्यांसह प्रवाशांना सोयीस्कर सेवा उपलब्ध होईल.

4. सांगोला ते दानापूर किसान रेल्वे सेवा पुन्हा सुरू करावी, जेणेकरून शेतकऱ्यांच्या शेतीमालाची वाहतूक अधिक सुलभ होईल.

5. मोडनिंब येथे ‘गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल’ची स्थापना करण्यात यावी, ज्यामुळे स्थानिक उद्योग, व्यापार आणि शेतकरी वर्गास नवे बाजारपेठेच्या दृष्टीने मोठा फायदा होईल.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या सर्व मागण्यां बाबत सकारात्मकता दर्शवली आहे. खासदार धैर्यशील मोहिते-पाटील माढा मतदारसंघातील महत्वाचे रेल्वे प्रश्न मार्गी लावण्याबाबत अधिक दक्ष असून प्रत्येक संसदीय अधिवेशना दरम्यान केंद्रीय रेल्वे मंत्री यांची भेट घेऊन सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहेत. यामुळे माढा लोकसभा मतदार संघातील सुजाण मतदारांना एकीकडे वाचाळवीर, निद्राधीन आणि आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे, पोकळ व खुजे नेतृत्व तर दुसरीकडे कृतिशील, जागृत, निर्मितीक्षम, भरीव, उच्च विचार कर्तृत्व यानिमित्ताने अनुभवायला मिळत आहे अशी चर्चा होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या