🟡 अकलूज नगरपरिषदेच्या वतीने ज्ञानेश्वर माऊली जन्मोत्सव उत्साहात साजरा
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे.
मुंबई दिनांक 15/8/2025 :
शासकीय सूचनेनुसार संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्मोत्सव अकलूज नगर परिषदेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त अकलूज शहरातून मोठ्या उत्साहात टाळ मृदुंग, भजनी मंडळ, शालेय विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि अकलूज नगरपरिषद कर्मचारी, नागरीक यांचे उपस्थितीत ज्ञानेश्वर महाराज यांचे पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. नगरपरिषद कार्यालय येथून सदर सोहळा सुरुवात करून विठ्ठल रुक्मिणी मंदिर, जुने ग्रामपंचायत कार्यालय, मारुती मंदिर, शिवापूर पेठ, पाटील वाडा, हनुमान तालीम चौक परिसरातून माऊलींचा नामघोष करत, टाळ मृदुंग गजरात , विविध खेळ खेळत जल्लोषात उत्साहात पालखी सोहळा मिरवणूक काढण्यात आली.


0 टिप्पण्या