लोकर खरेदी विक्री केंद्र जिल्हा स्तरावर सुरू करावी - संजय वाघमोडे

 


लोकर खरेदी विक्री केंद्र जिल्हा स्तरावर सुरू करावी -  संजय वाघमोडे            

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 13/7/2025 : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे लाखमोलाची लोकर ही खरेदीदार नसल्याने  ती नाईलाजाने अक्षरश: कचऱ्यात फेकून देण्याची वेळ मेंढपाळांवर येत आहे. शासनाने जिल्हास्तरावर लोकर खरेदी विक्री केंद्रे सुरू केल्यास लोकरीस योग्य भाव मिळेल. असे प्रतिपादन मेंढपाळ विकास समितीचे राज्यपाल नियुक्त सदस्य व यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांनी केले ते नाजरे मठ  (सांगोला) येथे मेंढपाळांच्या वतीने आयोजित घोंगडी बैठकीत बोलत होते.

क्रार्यक्रमास डॉ. सचिन दडस, प्रक्षेत्र व्यवस्थापक, पुण्यश्लोक आहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र- रांजणी, डॉ. पोपट कारंडे,  प्रक्षेत्र व्यवस्थापक, पुण्यश्लोक आहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र महूद, ता.सांगोला (जि सोलापूर)  शाहुवाडी उपाध्यक्ष आनंदा बंडगर, पत्रकार तानाजी टकले, आष्टा शाखाध्यक्ष भिमराव गावडे, शेंडूर शाखाध्यक्ष राजाराम हजारे, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी शेळी मेंढी महामंडळाच्या राजणी व महुद प्रक्षेत्राच्या वतीने मेंढपाळ विकास समितीच्या सदस्य पदी संजय वाघमोडे यांची नियुक्ती झालेबद्दल त्यांचा सत्कार डॉ.सचिन धडस व डॉ. पोपट कारंडे यांनी महामंडळाच्या वतीने केला.

संजय वाघमोडे बोलताना पुढे म्हणाले की २५ वर्षांपूर्वी लोकरीचा दर हा ३० रुपये ते ४० रुपये किलो  होता. गावोगावी लोकर व्यापारी फिरून  लोकर खरेदी करत होते. परंतु आज लोकर खरेदीसाठी व्यापारी येतच नसल्याने  मेंढपाळांना अक्षरशः लोकर कचऱ्यात टाकावी लागत आहे. त्यामुळे मेंढपाळांचे आर्थिक नुकसान होते. शेळी मेंढी महामंडळ प्रक्षेत्रावर लोकर खरेदी करत आहे त्याच धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात  जिल्हा व तालुका स्तरावर लोकर खरेदीविक्री केंद्र स्थापन केल्यास मेंढपाळांना लोकर विकणे सोयीचे होऊन त्यांना आर्थिक फायदा  होईल.

  शेळी मेंढी महामंडळाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनांविषयी माहिती देताना डॉ. पोपट कारंडे म्हणाले कि मेंढपाळांनी राज्य शासनाच्या सुरू असलेल्या राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजना, जिल्हास्तरीय विशेष घटक योजना, राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, चराई अनुदान योजना व एक गुंठा जमीन भाड्याने घेणे योजना या राज्य शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच सध्या सुरू असलेली केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन अभियान (एन एल एम) या योजनेचा मेंढपाळांनी लाभ घ्यावा. सदर योजनेमध्ये किमान १०० शेळ्या/ मेंढ्या व ५ बोकड किंवा मेंढी नर ते कमाल ५०० शेळ्या किंवा मेंढ्या व २५ बोकड किंवा मेंढे नर याकरिता ऑनलाइन स्वरूपामध्ये अर्ज करणे अपेक्षित आहे. या योजनेमध्ये ५०% अनुदान देण्यात येते व ५० टक्के रक्कम लाभार्थीने स्वहिस्सा व बँक कर्ज स्वरूपामध्ये प्राप्त करून घ्यावयाचा आहे. या योजनेचा लाभ वैयक्तिक लाभार्थी तसेच बचत गट किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या घेऊ शकतात. व काही अडचण आल्यास मेंढपाळानी शेळी मेंढी महामंडळाच्या प्रक्षेत्र कार्यालयाशी किंवा पशुसंवर्धन अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा 


      "मेंढपाळांनी त्यांच्याकडे उत्पादित होणारी लोकर ही टाकून न देता पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी तालुका कवठेमंकाळ जिल्हा सांगली या प्रक्षेत्रावर विक्रीकरिता आणावी. सदर मेंढपाळांची लोकर ही लोकरीच्या प्रतवारीनुसार रक्कम रुपये ३५ते ४० प्रति किलो या दराने खरेदी करण्यात येते. मेंढपाळांच्या लोकरीसाठी महामंडळाने प्रक्षेत्रावर बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे. मेंढपाळांनी वेळापत्रकानुसार लसीकरण व जंत निर्मूलन करून घ्यावे जेणेकरून साथीच्या आजाराने शेळ्या मेंढ्यांची मृत्यू होणार नाही. प्रक्षेत्रावर मेंढपाळांसाठी मेंढी व शेळी पालन व्यावसायिक प्रशिक्षण घेण्यात येते. शेळ्या मेंढ्यांना उपयुक्त असणाऱ्या बहुवार्षिक चारा पिकांचे बेणे, मुरघास, पैदासी करिता जातीवंत माडग्याळ जातीचे नर मेंढे व उस्मानाबादी जातीचे बोकड, लोकरीच्या विविध वस्तू विक्रीकरिता उपलब्ध आहेत". असे आवाहन डॉ.सचिन दडस यांनी उपस्थित मेंढपाळांना केले. 

  यावेळी  उल्हास धायगुडे बलवडी, सुखदेव बाबर चोपडी किसन बाबर हणमंत मार्कंड,भगवान बंडगर , रंगा बंडगर,बाळु सु बंडगर, बाळु हुनुरे, सावबा हुनुरे, अवघडे हुनुरे बिरू सू बंडगर , नवलू क बंडगर, रामा आपाजी बंडगर, मायाप्पा बंडगर , सुरज शेळके राजू मारुती बंडगर , बिरू सखाराम पुजारी (वाशी) गणपती सखाराम पुजारी वाशी , बाळू बिरू पुजारी वाशी रामा दगडू ढोणे सिद्धनेर्ली, सतीश तातोबा धनगर (एकोंडी ) विठ्ठल नारायण बंडगर , सोमनाथ धोंडीबा बंडगर इत्यादी मेंढपाळ उपस्थित होते.


यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून संजय वाघमोडे  यांनी मेंढपाळांच्या अनेक समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यात त्यांना यश येत आहे लांडग्याने बकरी  ठार केल्यानंतर नंतर भरपाई मिळती हे आम्हाला माहिती नव्हती ते  यांनी  मेंढपाळांना नुकसान भरपाई मिळवून देऊन प्रत्यक्ष  दाखवून दिले. व अनेक मेंढपाळांना नुकसान भरपाई लाखाच्या घरात मिळवून दिली. आज पहर्यंत अनेक संघटना तयार झाल्या परंतु जयंती आणि निवडणूक यापुरत्याच मर्यादित  राहिल्या परंतु यशवंत क्रांती ही संघटना ही कायम मेंढपाळ व समाजातील गोरगरीब पशुपालक शेतकरी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिली आणि  राहत आहे. अशा संघटनेच्या व संघटनेचे  नेतृत्व करणारे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांच्या पाठीशी मेंढपाळानी ही ठामपणे उभे राहावे.  जास्तीत जास्त मेंढपाळानी स्वतः सभासद होऊन इतर मेंढपाळांना  जास्तीत जास्त संख्येने सभासद करून संघटना वाढविण्याचा प्रयत्न करावा. असे उल्हास धायगुडे यांनी म्हटले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या