वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 17/7/2025 : "सुंदर" हा शब्द आपल्या सर्वांनाच खूप आवडतो. सर्वसाधारणपणे दिसण्याच्या बाबतीत सुंदर हा शब्द जरी वापरला जात असला तरी अनेक गोष्टी अशा छान असतात की त्या पाहिल्या की पटकन "व्वा,काय सुंदर आहे!" असा उदगार बाहेर पडतो.
सजीवांमध्ये सौंदर्य असते तसे निर्जीव गोष्टींमध्ये पण असते. अक्षर छान असते. एखादी मूर्ती खूप सुंदर असते. फर्निचर सुंदर असते तसे एखादे पुस्तक पण सुंदर असते.
अर्थात पाहणाऱ्याच्या नजरेत, मनात सौंदर्य असावे लागते मग निसर्गातील प्रत्येक घटक, सजीव-निर्जीव सुंदर दिसते. कोणाचा स्वभाव तर कोणाचे वर्तन आपल्या मनाला भावते. अर्थात त्यासाठी आपली दृष्टी सुंदर असावी लागते.
आजचा संकल्प
आपण आपल्या स्वभावात, आपल्या दृष्टीत चांगले भाव ठेवले तर आपल्याला सभोवतालची प्रत्येक गोष्टीचे आपले आपले सौंदर्य दिसेल. ते पाहण्याचा प्रयत्न करू व जग अजून सुंदर बनवू._
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या