🔰 मेंढपाळांनी संघटीत होणे गरजेचे - संजय वाघमोडे 🟨 तिळवणी येथे यशवंत क्रांती संघटनेच्या' नामफलक उद्घाटन व मेंढपाळ मेळावा संपन्न.

🔰 मेंढपाळांनी संघटीत होणे गरजेचे - संजय वाघमोडे 

🟨 तिळवणी येथे यशवंत क्रांती संघटनेच्या' नामफलक उद्घाटन व मेंढपाळ मेळावा संपन्न. 

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 22/06/2025 :

मेंढपाळांनी  सरकार कडून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या असतील तर आपला दबाव गट निर्माण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वानी यशवंत क्रांती संघटनेच्या' माध्यमातून संघटीत होणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राज्यपाल नियुक्त सदस्य संजय संजय वाघमोडे यांनी केले. ते तिळवणी तालुका हातकलंगले येथे यशवंत क्रांती संघटनेच्या नामफलक अनावरण प्रसंगी आयोजित मेंढपाळ मिळाव्यात बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा उपाध्यक्ष दादासो गावडे, संघटक पिंटू गावडे, तालुकाध्यक्ष यशवंत वाकसे, भरत नाईक, सरपंच राजेश पाटील, मा. उपसरपंच व विद्यमान ग्रा. सदस्य सुकमार चव्हाण,  पोलीस पाटील जगनाथ गायकवाड,   किसन चव्हाण, हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

   ते बोलताना पुढे म्हणाले यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून मेंढपाळांच्या तसेच पशुपालक शेतकरी पारंपरिक वनानिवासी यांच्या विविध प्रश्नावर शासन दरबारी आवाज  उठवून अनेक मागण्या मान्य करून घेतलेल्या आहेत. यापुढेही आपल्याला मेंढपाळ व्यवसाय करताना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी  संघटित होऊन लढा दिला तरच शासन मान्य करेल.     

     मेंढपाळानी आपल्या शेळ्या मेंढ्यांचे लसीकरण वेळेत करून घेणे गरजेचे आहे. तसेच आपल्या पशुसंवर्धनाची  काळजी घ्यावी. मा. पोलीस पाटील जगन्नाथ गायकवाड, सरपंच राजेश पाटील, भरत नाईक यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. 


 प्रारंभी मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या अतिशबाजीत  गावातून मिरवणुकीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच हार तुरे फेटे यांना बगल देऊन तिळवणी मेंढपाळांच्या वतीने वह्या देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

       यावेळी शाखा अध्यक्षपदी आमान्ना पुजारी, उपाध्यक्ष लिंगाप्पा मसाळे, सचिव दत्ता मसाळे, यांची तर सदस्य म्हणून राजू पुजारी, स्वप्निल आकाराम बंडगर, सागर महादेव मसाळे, अजित आप्पा मसाळे, सतीश सहदेव पुजारी, आनंद सिद्धू मसाळे, गोरख रामा मसाळे, सुरेश बाळू मसाळे, म्हाळू बापू मसाळे, लक्ष्मण रामा पुजारी,यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मेळाव्यास महिला, ग्रामस्थ, मेंढपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या