सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स. सा. कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर...

 

सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स. सा. कारखान्याचे

ऊस लागवड धोरण जाहीर... 

वृत्त एकसत्ता न्यूज

भाग्यवंत ल.नायकुडे, अकलूज.

(जयपूर, राजस्थान  येथून) 

दिनांक 17/06/2025 :

सहकार महर्षि सहकारी साखर कारखाना लि., शंकरनगर-अकलुज या कारखान्याने 2025-26 करीता मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव व वसंतदादा शुगर इन्स्टिट्युट, पुणे यांचे मार्गदर्शनाने खालीलप्रमाणे हंगाम व जातवार ऊस लागवडीचे धोरण जाहीर केले आहे.

लागण हंगाम

ऊस लागण कालावधी

ऊसाच्या जाती

आडसाली

1/7/2025 ते 31/8/2025

कोसी-671, को-86032, कोएम-0265

पुर्व हंगाम    

1/9/2025 ते 30/11/2025

कोसी-671, को-86032, कोएम-0265, 

एमएस-10001, व्हीएसआय 08005, फुले-15012

सुरु    

1/12/2025 ते 30/4/2026

कोसी-671, को-86032, एमएस-10001, व्हीएसआय 08005, फुले-15012

1/12/2025 ते 31/1/2026

कोएम-0265

खोडवा

बेणे खोडवा व गत सिझनमध्ये तुटलेल्या ऊसाचा खोडवा

वरील सर्व ऊस जातींचा खोडवा

     ऊस रोपे पद्धतीने लागवड केलेल्या क्षेत्राची लागण तारीख रोपे शेतात लावलेल्या तारखेच्या 15 दिवस अगोदरची घेण्यात येईल. अशाच पद्धतीने संपुर्ण लागण हंगामामध्ये ऊस रोपे लागवडीची तारीख घेण्याचा कार्यक्रम राबविला जाईल.

    सहकार महर्षि कारखान्याच्या सर्व सभासदांनी ऊसाची लागवड 5 फुट अंतर सरी पद्धतीने करावी. यामुळे प्रती एकरी ऊस उत्पादनात वाढ होईल. सदर सरी पद्धतीने लागवड केल्यामुळे ऊसावरील रोग व कीड नियंत्रित करणे सोपे जाते. 

    सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामार्फत सालाबादप्रमाणे लागण हंगाम 2025-26 (गळीत हंगाम 2026-27) साठी ऊस विकास योजना राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये कारखान्याकडून सभासदांना दर्जेदार सेंद्रिय व जिवाणू खते तयार करुन विभागीय शेती कार्यालय येथे उपलब्ध करुन देत आहोत. सदर खते ऊस उत्पन्न वाढीसाठी अतिशय उपयुक्त असून सभासदांनी त्याचा जास्तीत जास्त वापर करावा. त्याचबरोबर कारखाना ऊस विकास योजनांमध्ये सभासदांनी सहभागी होवून एकरी ऊस उत्पादन वाढवून चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्यास उपलब्ध करुन देऊन सहकार्य करावे अशी विनंती कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.राजेंद्र केरबा चौगुले यांनी केली आहे.

    “नव्याने आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करुन एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी कारखाना प्रयत्नशील असून सभासदांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा तसेच  येणा-या काळात ऊस तोडणी मजुरांची कमतरता भासणार असल्याने यंत्राच्या सहाय्याने ऊस तोडणी करावी लागणार आहे, त्याकरीता सर्व सभासदांनी पाचपट अंतर सरीने ऊस लागवड करावी" - जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील (चेअरमन - सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील स.सा.का.लि., शंकरनगर-अकलूज)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या