🔰मन इंद्रधनू
🟢 इमोशनल ते प्रॅक्टिकल 🔵
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 01/06/2025 :
सो बरसात का मौसम शुरू तो हो गया...!!!!
तो बरसत रहातो... मनातील अनावर भावनांसारखा आणि मग अशा वेळी *इजाजत* हा चित्रपट आठवतो. ८ जुलै १९८७ रोजी गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली प्रदर्शित झालेला हा हिंदी चित्रपट नसीरुद्दीन शाह (महेंद्र) आणि (रेखा) सुधा यांच्या सुंदर अभिनयासाठी गाजला होता.
"जब बरस जायेगी तो आप ही थम जायेगी"
या *इजाजत* चित्रपटात रेल्वे स्टेशनवर ते दोघेजण बसलेले असताना महेंद्रच्या “पाऊस कधी थांबेल?” या प्रश्नावर सुधानं दिलेलं हे उत्तर.. !! वरकरणी पावसाबद्दलचा वाटणारा हा संवाद मुळात पावसाबद्दल नाहीच मुळी. पाच वर्षांपूर्वी दोघंही सोबत असतान हळूहळू मूक होत गेलेले असंख्य संवाद, एकमेकांना विनाकारण दुखावल्याच्या वेदना, अपराधीपणाची जाणीव.. असं सगळं जर आता उन्मुक्तपणे बाहेर आलं तरच दोघांच्या काळजाला झालेल्या जखमा, ठसठसत असलेल्या वेदना कदाचित भरुन येणार आहेत.. कदाचित एकमेकांना आणि स्वत:ला माफ करणं त्यांना जमणार आहे..! एकंदरीत असं हे सगळं त्या एका वाक्यात आलं आहे.
जैसा दर्द हो वैसा मंज़र होता है,
मौसम तो इंसान के अंदर होता है।
-अज़ीज़ ऐजाज़
तर मंडळी, आतून तुटलेली माणसं मनाने अतिशय ठाम होत जातात, वास्तविक होत जातात.. !! आपण ज्या वागण्याला प्रॅक्टिकल म्हणतो तशी बनत जातात. त्यांचे इमोशनल म्हणजे भावनिक होणे कालांतराने बंद होत जाते. ही आतून तुटलेली माणसं सहसा फारशी व्यक्त होत नाहीत. त्या लोकांपुढे तर बिलकुलच नाही, ज्यांच्यामुळे त्यांना काही ना काही सहन कराव लागलेलं असतं. २+२=५ असं जरी कुणी म्हणालं तरी ही माणसं *it's okay* म्हणून निघून जातात.
माणूस हे एक प्रचंड अद्भुत असं रसायन आहे. एकाचं आयुष्य दुसऱ्या सारखं अजिबात असत नाही. प्रत्येकजण एक स्वतंत्र आयुष्य, वेगळे अनुभव घेत जगतो. मानवी जीवनाचं हेच तर खरे सौंदर्य आहे. माणसाच्या आयुष्यातल्या सगळ्या शक्यता धुंडाळायचा आपण प्रयत्न करतो.. आणि दरवेळी हाताला नवीन आगळं वेगळं असं काही गवसतं..!!! हाताला सतत नवीन काही गवसत रहाणं हेच मानवी आयुष्याचं प्रयोजन असावं असं वाटायला लागतं..!
जीवनाच्या संघर्षात तावून सुलाखून प्रॅक्टिकल बनलेली ही माणसे वाद टाळतात, माणसांशी बोलण टाळतात. एका पॉइंट नंतर त्यांचा खरं खोटं जाणून घेण्याचा सेन्स म्हणजेच realisation sense खरोखरच झपाट्याने वाढलेला असतो. समोरचा माणूस किती खर बोलतोय, की खोट बोलतेय, फायद्यासाठी बोलतोय की स्वार्थासाठी हे त्यांना पटकन समजून येत. काहीच प्रतिक्रिया न देता ती माणसे पुढे निघून जातात, आणि यातच खरा शहाणपणा असतो. थोड्या कालावधी नंतर ही माणसे ध्येयनिष्ठ होऊन जातात. कुणाचा सल्ला नको असतो, कुणाचा हस्तक्षेप नको असतो कारण जेव्हा खऱ्या आधाराची गरज असते तेव्हा ती गोष्ट त्यांना मिळालेली नसते म्हणूनच ती स्वयंपूर्ण म्हणजे *आत्मनिर्भर* होतात. आतून तुटलेल्या माणसाला ना कसल्या वादळाची भिती असते ना संकटांची काळजी ...कारण आता आपण खंबीरपणे लढू शकतो याची खात्री मनाला पटलेली असते. *छोट्या छोट्या गोष्टीपासून *इमोशनल* पासून *प्रॅक्टिकल* होण्यापर्यंतच्या प्रवासाची सुरवात आतून तुटण्यापासूनच होते*. म्हणूनच तर मंडळी,
कभी कभी दर्द भी अच्छा होता है
अशावेळी रजिया सुलतान मधलं ए दिले नादान आठवतं...
हम भटकते हैं क्यों भटकते हैं... दश्तों सेहरा में
फोटो सौजन्य गुगल
राजश्री (पूजा) शिरोडकर
एम ए मानसशास्त्र
कोल्हापूर
0 टिप्पण्या