⛔ बघा पटतय का......‼️

बघा पटतय का......‼️ 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 20/06/2025 :

मी बऱ्याच पोस्टमधे पाहतो की लेडीज आपला फोटो टाकतात आणि विचारतात वाटते का मी दोन मुलांची आई, माझ वय किती वाटत??? या असल्या पोस्टवर पुरुषांनी काय कॉमेंट्स कराव्यात??बऱ्याचदा अगदीं कमी कपड्यात नाच दाखवला जातो आणि मग येतात त्यावरच्या कॉमेंट्स… वाचताना लाज वाटावी अशा

पण हे सगळं कुणासाठी? काही सेकंदाचं कौतुक? काही फॉलो लाईक्स आणि फेक फॉलोअर्ससाठी?

मुलींनो, तुम्ही इतक्या कमी किमतीच्या लाईक्ससाठी स्वतःचं खरं सौंदर्य विकून टाकता आहात का?

एक क्षण थांबा... डोळे मिटा… आणि आठवा, ती लहानशी मुलगी जिच्या डोळ्यात स्वप्नं होती. जी सांगायची, "मी मोठी होऊन मोठं काही करणार" ती कुठे गेली? त्या स्वप्नांचं आज काय झालं?

सोशल मीडियावर अंगप्रदर्शन केलं म्हणून कुणी तुमचं कौतुक करत नाही. ते हसतात, शेअर करतात, आणि एका क्षणात विसरून जातात. पण ज्या मुलीने अभ्यासात टॉप केलं, जीने कविता लिहिल्या, जीने आईच्या कष्टांवर कविता केल्या – तिचं नाव मात्र लक्षात राहतं

एक लक्षात ठेवा – अंगप्रदर्शन करून मिळणारा सन्मान कधीच टिकत नाही. शरीर पाहणारे अनेक मिळतील, पण मन, विचार, शब्द – हे समजून घेणारे फार थोडे असतात. आणि हे समजून घ्यायचं असेल, तर स्वतःचं मोल आधी स्वतः ओळखा

कोण म्हणतं सौंदर्य दाखवावं लागतं? सौंदर्य तर तुम्ही आहातच – पण ते चेहऱ्यावर नाही, तर तुमच्या शब्दांत आहे, तुमच्या कर्तृत्वात आहे, आणि सगळ्यात जास्त – तुमच्या ‘स्व’ मध्ये आहे

आणि हो, प्रत्येक पुरुष वाईट नसतो. पण जर तुम्ही स्वतःहून अंग दाखवून पोस्ट करत असाल, तर ‘क्लीन’ कॉमेंट्सची अपेक्षा ठेवणं म्हणजे दिवा विझवून प्रकाशाची आशा ठेवणं

म्हणून विनंती आहे, तुमच्या लहान बहिणींसाठी, भविष्यातल्या पिढीसाठी, आणि स्वतःच्या आत्मसन्मानासाठी – काही क्षणासाठी नाही, आयुष्यभरासाठी तुमच्या नावावर मानाने लक्ष ठेवू शकेल अशी पोस्ट टाका

आज किती तरी स्त्रिया जेवण बनवण्याचे व्हिडिओ , ज्वेलरीचे व्हिडिओ सुंदर गाण्याचे व्हिडिओ, कवितांचे व्हिडिओ टाकून तसेच किती लेडीज आहेत ज्या Motivational विचार टाकतात त्यांचे लाखो Followers आहेत तुम्ही लोकांना चांगल द्या लोक ही नक्की तुम्हाला चांगलच देतील

शब्दात सौंदर्य असो, कलेत जादू असो, मनात आत्मभान असो, आणि जगण्यासाठी कारण असो…तुम्ही फक्त सुंदर नाही – तुम्ही साक्षात प्रेरणा व्हा

राजेश शेलार

9326365396

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या