डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व नूतन इमारत उदघाटन समारंभ संपन्न

डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व नूतन इमारत उदघाटन समारंभ संपन्न 

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 

वृत्त एकसत्ता न्यूज

माळशिरस/प्रतिनिधी दिनांक 09/06/2025 : श्रीनाथ विद्यालय ज्युनिअर कॉलेज व महात्मा फुले विद्यालय माळशिरस या विद्यालयाचे संस्थाध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख (माजी नगराध्यक्ष,नगरपंचायत माळशिरस) यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर व नूतन इमारत उदघाटन समारंभ संपन्न झाला संपन्न झाला. यावेळी ना.प्रा.राम शिंदे(सभापती, विधानपारिषद), माजी आ.राम सातपुते हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी माळशिरस व आसपासच्या परिसरातील कार्यकर्त्यांनी विद्यालयात सकाळपासूनच शुभेच्छा देण्यासाठी हार, फेटा, शाल तसेच विद्यार्थ्यांच्यासाठी वही घेऊन उपस्थिती लावली होती.यावेळी विद्यालया मार्फत रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाण्याचा जार भेट वस्तू देण्यात आली.यावेळी एकूण १५३ जणांनी रक्तदान केले.विद्यालयाकडून सर्वांना जेवणाची सोय करण्यात आली होती.

यावेळी नगराध्यक्ष विजय देशमुख, माधव खांडेकर (मुख्याधिकारी, नातेपुते) नगरसेवक महादेव कोळेकर, आबा धाईंजे, संतोष वाघमोडे, रणजित ओवाळ, दादा शिंदे, जगन्नाथ गेजगे, प्रविण केमकर, धनाजी देवकर, अजिनाथ वळकुंदे, नगरसेविका ताई वावरे, अर्चना देशमुख, कोमल जानकर, पुनम वळकुंदे, हनुमंत सुळ, सोपान नारनवर, ॲड.बी.वाय.राऊत, ॲड.शरद माने, बाळासाहेब धाईंजे, गणेश पाटील, बाळासाहेब कर्णवर, मिलिंद सरतापे, अमर माने देशमुख, नागेश वाघमोडे, वैभव जानकर, प्रितमसिंह देवकाते, संचालक लक्ष्मण पवार, बाळासाहेब सरगर, गोरख देशमुख, रावसाहेब देशमुख, महादेव माने, महेश बोत्रे, निलेश घाडगे, गौरव गांधी, विजय गोरड, बबन देवकाते, राजाभाऊ देवकाते, सचिन वावरे, बाबासाहेब माने, हसन मुलाणी,अभिनंदन देशमाने, अनिरुद्ध शिंगाडे, देविदास पाटील, प्राचार्य योगेश गुजरे, मुख्याध्यापक मधूकर गुंड, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्य पालक, ग्रामस्थ वर्ग उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या