🟩 "श्री शंकर" स. सा. कारखाना कार्यस्थळावर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 06/06/2025 : श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि. सदाशिवनगर (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथे कारखाना स्थळावर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे जी. व्ही. निकाळजे (विशेष लेखापरीक्षक वर्ग-1 सहकारी संस्था सोलापूर) यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत डुबल,जनरल मॅनेजर रविराज जगताप, चिफ इंजिनिअर समाधान कागदे , डिस्टलरी मॅनेंजर संजय मोरे, डेप्युटी चिफ इंजिनिअर निलेश जाधव, पर्यावरण अभियंता अभिजित माने, सुरक्षा अधिकारी ज्ञानदेव पवार व कर्मचारी उपस्थित होते.

0 टिप्पण्या