मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 01/06/2025 : आपले मन हे आपले गुरू असते. मन, मनातील विचार आपल्याला घडवतात. चुकीच्या गोष्टीकडे आकर्षित होणारे मन असते व चांगल्या गोष्टी करण्यास प्रवृत्त करणारे मनच असते.
मन हे लोहचुंबकाप्रमाणे असते. आपण त्याच्यावर सुसंस्कार केले तर ते त्याकडे ओढले जाते व आपल्याकडून तसेच संस्कारी वर्तन घडते. म्हणून कुविचारांना मनात थारा दिला नाही तर आपले वर्तन बिघडण्याची शक्यता कमी असते.
दुसरे म्हणजे आपल्या मनात ज्या भावना आहेत त्याच आपल्याकडे आकर्षित होतात. तुम्ही दुसऱ्यांवर प्रेम करणारे वर्तन केले तर समाजही तुमच्यावर प्रेम करेल अन्यथा तुम्हाला तुमच्या दूरवर्तनाचा परतावा नक्की मिळतो.
आजचा संकल्प
मन करा रे प्रसन्न! हा मंत्र लक्षात ठेऊ. संत रामदासांचे मनाचे श्लोक नुसते पाठ न करता आचरणात आणू व सर्वांचेच जीवन सुसह्य करू._
सौ. स्नेहलता स. जगताप
0 टिप्पण्या