🟩 मनाची शुद्धता
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 05/06/2025 : आपण भारतीय उत्सवप्रेमी माणसे आहोत. आपले वर्षातील सण, जयंती-पुण्यतिथी, वेगवेगळे दिवस म्हणजे मिरवणुका, DJ, ढोल-ताशा अन् तत्सम वाद्यांचा कर्णकर्कश्य आवाज व गोंगाट. आजकाल लग्न, बारसे या घरगुती कार्यक्रमांचे स्वरूप म्हणजे देखावा झाला आहे.
पूर्वी गर्दी थोडी आटोक्यात असायची. दळणवळणाची साधने, संपर्क साधणे, आमंत्रणे देणे यावर मर्यादा होत्या. आता तसे राहिले नाही. व्हॉट्सअँप च्या माध्यमातून जग जवळ आले. गाड्या घरोघरी असल्यामुळे व आपण गेलेच पाहिजे ही प्रत्येकाची भावना असल्याने प्रत्येक कार्यक्रमाला कुटुंबे हजेरी लावतात.
यजमान देखील मोठेपणा दाखविण्याच्या नादात लाखो करोडो रुपये खर्च करतात. भरपूर देखावा केला जातो. नको इतकी सजावट केली जाते. विधीचे महत्त्व जाऊन तेथेही वेगळे स्वरूप (इव्हेंट) आले आहे.
आजचा संकल्प
_आपण सुज्ञ बनून या गोष्टी, बडेजाव कमी करू. मर्यादित आमंत्रणे देऊन घरगुती स्वरूपाचे कार्यक्रम करू. अनावश्यक गर्दी व सर्वप्रकारचे प्रदूषण टाळू.
सौ. स्नेहलता स. जगताप.
0 टिप्पण्या