🟩 विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 01/06/2025 :
आज सर्वव्यापी जन्मदिवस दिन.
१ जून जन्मतारीख असलेल्या आपल्या सभोवताली, नात्यात भरपूर व्यक्ती आहेत. शाळेत घालताना ज्यांची खरी जन्मतारीख पालकांना सांगता आली नाही त्यांची १ जून.
जन्म तारीख, वेळ, जन्म ठिकाण अशा वरून बाळाची पत्रिका काढतात. ही पत्रिका बाळाचे भविष्य सांगते. (ते खरे होतेच असे नाही) ज्यांची १ जून जन्म तारीख शाळेत लावलेली आहे, त्यांची पत्रिका काय सांगेल?
आपले कर्म-विचार आपले भविष्य घडवते. पत्रिका नसली तरी आपण ते घडवू शकतो. शिक्षण घेताना जोडीला माणूस म्हणून कसे जगायचे हे संस्कार पण घेतले तर आपली जन्मतारीख किती आहे, वेळ शुभ होती का अशुभ याचा प्रश्न येत नाही.
आपण घडायचे, देश घडवायचा!
जयहिंद!🇮🇳
सौ. स्नेहलता स. जगताप
0 टिप्पण्या