🟣 पारंपरिक वननिवासी, पशुपालक शेतकरी, मेंढपाळ, याच्या वनविभागातील अडचणी संदर्भात बैठक संपन्न..
🔵 'यशवंत क्रांती संघटनेच्या' प्रयत्नांना यश
वृत्त एकसत्ता न्यूज
भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे.
(गोधरा रेल्वे स्टेशन येथून)
दिनांक 14/06/2025 :
नाम.गणेश नाईक (वनमंत्री महाराष्ट्र राज्य) यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. ११ जुलै रोजी दुपारी १ वाजता सभागृह क्रमांक ४ सह्याद्री अतिथीग्रह मलबार हिल मुंबई येथे कोल्हापूर जिल्ह्यातील वन विभागातील विविध प्रश्नावर बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त सचिव, वनविभाग,श्योमिता विश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन व बलप्रमुख) महाराष्ट्र राज्य नागपूर, प्रधान मुख्य वनसंरक्षक संरक्षण वन्यजीव महाराष्ट्र राज्य नागपूर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक नोडल ऑफिसर महाराष्ट्र राज्य नागपूर, मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर, जी. गुरुप्रसाद, उपवनसंरक्षक प्रादेशिक कार्यालय कोल्हापूर, इ. अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील उपवनसंरक्षक यांच्या चुकीच्या निर्णयाचा फटका मेंढपाळ पशुपालक शेतकरी पारंपरिक वन निवासी यांना बसत होता. याबाबत यशवंत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आलेला होता. याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील आजी, माजी, लोकप्रतिनिधींना या संदर्भात संघटनेचे वतीने निवेदन देण्यात आली होती. मा.खासदार राजू शेट्टी यांनाही यशवंत क्रांती संघटनेचे वतीने निवेदन देण्यात आले होते. खासदार राजू शेट्टी यांनी निवेदनाची दखल घेऊन संघटनेच्या शिष्टमंडळासमोरच वन मंत्री गणेश नाईक यांच्या कार्यालयात फोन लावून बैठक आयोजित करण्यासंदर्भात सूचना केलेली होती. सदर सूचनेनुसार दिनांक ११ जुन रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले व बैठकीस उपस्थित राहणे बाबत वनविभाग अधिकारी यांना ही परिपत्रक काढले.
सदर बैठकीस माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी तसेच यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राज्यपाल नियुक्त सदस्य संजय वाघमोडे, राजु वडाम स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा सरचिटणीस, यांनी जिल्ह्यातील वन विभागातील अधिकाऱ्यांचा कारभार व पशुपालक पारंपरिक वन निवासी यांना येणारे अडचणी संदर्भात बैठकीमध्ये विषय मांडले. सदर बैठकीमध्ये मांडण्यात आलेल्या सर्व विषयांना वनमंत्री गणेश नाईक यांनी तात्काळ सहमती दर्शवून त्या पद्धतीने कारवाई करण्याच्या सूचना सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
बैठकीमधील विषय
पारंपरिक वन निवासी यांना वन कर्मचाऱ्याकडून त्रास देण्यात येतो तसेच घर दुरुस्ती किंवा नवीन घर बांधणी करताना अडचणी आणल्या जातात त्या तात्काळ थांबवण्यात याव्यात अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात यावी.
जंगल क्षेत्रातून जाणाऱ्या रस्त्यावरून किंवा पायवाटेवरून जात असताना गवे किंवा इतर वन्य प्राणी हल्ला करतात अशा हल्ल्यात नुकसान भरपाई दिली जात नाही ती तात्काळ घेण्यात यावी.
सर्पदंशाने मृत्यू झाल्यास मृत्तांच्या नातेवाईकास नुकसान भरपाई देण्यात यावी.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्या मृतांच्या नातेवाईकास व स्थानिकांना नोकरीत सामावून घेण्यात यावे.
वन हद्दीत राहणारे धनगरवाडी व पारंपारिक वन निवासी यांना या स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य देण्यात यावे.
मेंढपाळ भटकंती करत असताना त्याचा मुक्काम किंवा मेंढ्या चराई वन हद्दीत केली जाते अशावेळी मेंढपाळावर त्याचे साहित्य किंवा मेंढ्या जप्त करण्याची कारवाई करण्यात येते ती करण्यात येऊ नये.
वन्यप्राण्यांच्या हल्यात मृत्युमुखी पडलेल्या पाळीव जनावरे ट्रप कॅमेऱ्याच्या निगराणी खाली ठेवण्यात येतात ते हा तोंडी आदेश रद्द करण्यात यावा.
सरसकट मेंढपाळांना बारा महिन्याचे चराई पास देण्यात यावे.
वन हद्दीत वन्यप्राण्यांकडुन हल्ला झाला तरीही त्याची नुकसान भरपाई देण्यात यावी.
शहरी भागातील भटक्या कुत्र्यांना पकडून जंगलात इतर ठिकाणी सोडून दिले जाते. ते बाबत भटक्या कुत्र्यांना इतर ठिकाणी न सोडण्याबाबत महानगरपालिका व नगरपालिका यांना सुचना देण्यात याव्यात.
इत्यादी मागण्यावर बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन वनमंत्री गणेश नाईक यांनी सर्व मागण्या मान्य करून उपस्थित अधिकाऱ्यांना आदेश काढण्या बाबत बैठक सुचना दिल्या.
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात संजय वाघमोडे, राजु वडाम, स्वातिक पाटील, विजय पाटील, अनुस्कुरा डोंगरी तालुका, अध्यक्ष, विष्णू बागवे, अनुस्कुरा, रमेश कांबळे उखळू, इत्यादींचा समावेश होता.


0 टिप्पण्या