वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 01/06/2025 : शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान (पिंपळगाव जलाल, तालुका येवला जिल्हा नाशिक) च्या राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे सदस्य प्रशांत शहादू वाघ यांनी सांगितली. या स्मृती पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख अतिथी सेवाजेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे (संस्थापक संपादक साप्ताहिक अकलूज वैभव आणि पाक्षिक वृत्त एकसत्ता) यांच्याशी भ्रमणध्वनीवरून ते बोलत होते.
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान (पिंपळगाव जलाल, तालुका येवला जिल्हा नाशिक) च्या वतीने शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय चौथ्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याचे बुधवार दिनांक 4 जून 2025 रोजी पांडुरंग कृपा लान्स, येवला - कोपरगाव मख्य रस्ता, टोलनाक्याजवळ, रेल्वे गेट समोर, पिंपळगाव जलाल, तालुका येवला, जिल्हा नाशिक येथे आयोजन करण्यात आलेले आहे.
प्रतिष्ठानने महाराष्ट्रातील लेखक, कवी यांचेकडून मागविलेल्या कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी आणि ललित लेखन अशा कलाकृतींचे ज्या त्या साहित्य प्रकारातील तज्ञ परीक्षकांकडून तपासणी करून निवड केलेल्या प्रत्येक साहित्य प्रकारातील एक कलाकृती असे चार साहित्य कलाकृती पुरस्कार आणि काव्य वाचन स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय, आणि उत्तेजनार्थ दोन असा पुरस्कार प्रदान सोहळा शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्यावतीने भव्यतेने संपन्न होणार आहे.
स्मृती पुरस्कार वितरण सोहळा भव्यतेने यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय शहादू वाघ, उपाध्यक्ष यमुना अशोक गोतिस (नारळकर), सचिव राजेश शहादू वाघ, खजिनदार अशोक परसराम गोतिस (नारळकर), सदस्य जालिंदर परसराम गोतिस (नारळकर), सदस्य प्रशांत शहादू वाघ, सदस्य अंजनाबाई शहादू वाघ हे मान्यवर परिश्रम घेत आहेत.
0 टिप्पण्या