🔵 विचारधारा 🟢
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. (केदारनाथ येथून)
मुंबई दिनांक 19/05/2025 :
सध्या भारत-पाकिस्तान युद्ध हा चर्चेचा विषय आहे. युद्ध विराम जरी घेतला असला तरी ते थांबले किंवा संपले असे नाही. दोन्ही देश वेगवेगळे दावे करत आहेत. आम्ही जिंकलो, कोणाचे किती पाडले, किती मारले याची खरी-खोटी आकडेवारी चालू आहे.
आपणही हे सर्व मन लावून वाचतो, ऐकतो, पाहतो आहोत. आपण वरचढ आहोत याचा अभिमान वाटत आहे. मोठे युद्ध होऊन त्यांची कायमची जिरावावी असे आपल्याला मनापासून वाटते.
पण मुलांनो, ज्या सैन्याच्या जीवावर आपण उड्या मारतोय त्यांच्या जीवाचा व त्यांच्या कुटुंबियांच्या मनाचा कधी विचार केलाय का? आई-वडील, पत्नी, मुले, भावंडे कोणत्या मानसिकतेत असतील? लग्नाच्या चौथ्या दिवशी जो फौजी सीमेवर गेलाय त्याच्या पत्नीची व इतर कुटुंबीयांची मनःस्थिती लक्षात येते का!?
युद्ध वाटते तेवढे कोणालाच सोपे नाही. ना आपल्याला ना शत्रूला.
सौ. स्नेहलता स. जगताप._

0 टिप्पण्या