पाकिस्तान व नरक
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 23/5/2025 : आपल्याच शेजारचा शत्रू राष्ट्र पाकिस्तान बद्दल दिवसातून एकदा तरी प्रत्येक भारतीयांच्या मनात विषय येत असेल पाकिस्तान बरबाद व्हावा असे प्रत्येक सच्च्या भारतीयाला वाटत असते पण काही छुपा अजेंडा बाळगणाऱ्या देशद्रोही जातीयवादी लोकाना पाकिस्तान आबाद व्हावा अशी मनोमन इच्छा आहे
हसके लिया है पाकिस्तान
लढके लेंगे हिंदुस्तान
ही त्यांची आवडती घोषणा आहे . हा विषय लिहायचे कारण म्हणजे भारतीय सिनेसृष्टीतील एक कवी जावेद अख्तर यांचे भाषणातील एक वाक्य सर्व मीडियावर दाखवले जात आहे त्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की मला सोशल मीडियावर जिहादी म्हटले जाते पाकिस्तानात निघून जा असे म्हटले जाते. पण मी पाकिस्तान जाण्यापेक्षा नरकात जाईल या वाक्यातून त्यानी आपण पाकिस्तान प्रेमी नाही हे दर्शवण्याचे आटोकाट प्रयत्न केले आहेत. पण भारतामध्ये जे विचार आचार उच्चार स्वातंत्र्य आहे. ते पाकिस्तानात कधीही मिळणार नाही. भारतातील बहुसंख्य यांच्यावर आपण काही आरोप केले तर आपले कोणी काही करत नाही. याउलट पाकिस्तानातील बहुसंख्यांका वर आपण काय आरोप केले तर आपल्याला कायमचे तुरुंगात सडावे लागेल. भारतामध्ये जे सुरक्षिता आहे ती पाकिस्तानात नाही.
भारतामध्ये तो कोणत्या जातीचा गीतकार आहे हे न पाहता त्याला त्याच्या गुणांवर किंमत दिली जाते ती पाकिस्तानात मिळणार नाही म्हणून नरकात जाणे जावेद भाईला मान्य आहे पाकिस्तानने नको हे ते कबूल करतात हे जावेदभाईंनी मनापासून म्हणाले आहे का ढोंग आहे हे त्यांच्या जीवाला माहीत.
पण क्रिकेट मॅच मध्ये पाकिस्तान जिंकल्यावर फटाके फोडणारी पाकिस्तान जिंदाबाद म्हणून घोषणा देणारे मनोमन पाकिस्तान वर प्रेम करणारे हजारो नव्हे लाखो लोक या देशात आहेत त्यांनी या जावेदभाईंच्या विधानांचा विचार करावा. त्यांना येथे व्यवसाय करताना, प्रगती करताना उच्चार विचार व आचार स्वातंत्र्य उपभोगताना कधीही अडचणी येत नाही. पण तरीही मनोमन या लोकांचा पाकिस्तानकडे ओढा आहे. त्यांनी भारतामध्ये जे स्वातंत्र्य मिळते, सुबत्ता मिळते, जी मुबलकता आहे की पाकिस्तानात नाही हे ओळखले पाहिजे.
मुजाहिदीन व पाकिस्तान
फाळणीच्या वेळी भारतातून गेलेल्या मुसलमानांना पाकिस्तान मध्ये आजही मुजाहिदीन म्हणून ओळखले जाते. त्यांना तेथील नागरिकांचा दर्जा व मान मिळत नाही हे सर्व लक्षात ठेऊन सुद्धा काही जण पाकिस्तान प्रेमी झालेले आहेत. भारता सारखी श्रेष्ठता , सुरक्षितता त्यांना अन्य कोणत्याही देशात मिळणार नाही हे माहीत नाही का ?
2014 पासून असुरक्षित
आमच्या देशातील काही हॉलीवुड स्टार हे 2014 साल पासून आपणास या देशात असुरक्षित वाटत आहे असा कांगावा करताना दिसतात. पी .के .सारखा चित्रपट काढून हिंदू देवतांची यथेच्छ टिंगल या देशात करता येते हे अन्य कोणत्याही देशात, धार्मिक राष्ट्रात करता येणार नाही हे त्यांना कळत नाही.
डोक्यावर घेऊन नाच
जावेद अख्तर सारख्या अनेक कलाकारांना येथील बहुसंख्य समाज त्यांचा धर्म व त्यांची जात याचा विचार न करता डोक्यावर घेऊन नाचते कोट्यावधी रुपये मिळवून देते हे पाकिस्तानात शक्य होणार नाही हे यांना कळत नाही.
जावेद अख्तर व हिंदी भाषा
आपल्या महाराष्ट्रात वॉचमन, सेल्समन हे हिंदी भाषिक आहेत. ते मराठीत बोलत नाहीत म्हणून त्याना मारहाण होते. दुकानावर मराठी भाषा भाषेचा बोर्ड नाही म्हणून दुकाने फोडली जातात. परवा मुंबईचे एका उपनगरात दोन तरुणी मराठी असताना त्या इंग्रजीत बोलल्या म्हणून त्याला अपमानास सामोरे जावे लागते. हे सर्व मराठी प्रेम विशेषतः ज्या पक्षांच्या मध्ये आहे त्या पक्षांच्या कार्यक्रमाला गेली पन्नास वर्षे होऊन अधिक काळ मुंबईत राहणारे पण मराठी न शिकलेले जावेद अख्तर आवश्यक असतात. ते या नेत्यांशी मराठीत बोलत नाहीत किंवा त्यांच्या कार्यक्रमात मराठीत बोलत नाहीत हे नेते पण त्यांच्याशी हिंदीत बोलतात पण मराठी स्वाभिमानाने हे नेते जावेदभाईंना मराठी बोलण्याचा कधीही आग्रह धरत नाहीत. मग मारहाण धक्काबुक्की ही गोष्ट तर नाहीच. अशा दुहेरी व्यक्तिमत्त्वाच्या नेत्यांच्या मुळे जावेद भाईंच्यासारखे अनेक तथाकथित धर्मनिरपेक्ष अभिनेते व कलाकार हे आपला छुपा अजेंडा चालवत आहेत.
यावरून मला एक जुनी गोष्ट आठवत आहे.
जॉर्ज फर्नाडिस छे जनार्दन फडणीस
आचार्य अत्रे व जॉर्ज फर्नांडिस मुंबई महानगरपालिकेमध्ये एकाच वेळी नगरसेवक होते जॉर्ज फर्नांडिस यांनी महानगरपालिकेत मराठीकरणावर व मराठी भाषा यावर फार मोठे भाषण केले व त्यांनी इंग्रजी शब्द न वापरता मराठी भाषा वापरावी असे ठासून सांगितले. त्यावेळी अत्रेंच्या सारखा हजरजबाबी माणूस गप बसेल तर ते अत्रे कसले त्यांनी जॉर्ज फर्नांडिस याना सांगितले एवढे जर तुम्हाला मराठीचे प्रेम आहे तर तुमचे नाव जॉर्ज फर्नांडिस बदलून त्या ऐवजी जनार्दन फडणीस ठेवावे. यातील विनोदाचा भाग सोडला तर आचार्य अत्रे यानी नेमक्या मुद्द्यावर बोट ठेवलेले आहे.
ॲड. अनिल रुईकर
98 232 55 049
इचलकरंजी

0 टिप्पण्या