संत व महापुरुषांचे देशात आगळे वेगळे स्थान

 

संत व महापुरुषांचे  देशात आगळे वेगळे स्थान 

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क  

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. ( केदारनाथ येथून)

दिनांक 19/05/2025 :

आपली भारतीय संस्कृती अनेक धर्म, अनेक जाती, वर्ण यांना बाजूला सारून आपण सर्वजण एकाच परमेश्वराची लेकरे आहोत अशा प्रकारची संस्कृती जोपासल्यामुळे संत ,साधू ,ऋषी यांनी आपल्या महाराष्ट्रात व देशात आगळे वेगळे स्थान निर्माण केलेत्यामुळे लिंगभेद, जातीभेद, धर्मभेद यांना बाजूला सारून आपण सर्व समान आहोत. सर्वधर्मसमभाव ह्या विचाराला ठेवून धर्म, नीती, आचार, विचार, संस्कृती याचं रक्षण करण्याचे काम संतांनी व महापुरुषांनी केलेला आहे जेवढे संत महत्त्वाचे तेवढेच महापुरुषांनी समाजामध्ये आगळे वेगळे स्थान निर्माण करून आपण सर्वजण एकच आहोत अशा प्रकारची महाराष्ट्रातील संतांनी स्वातंत्र्य समता बंधुता न्याय  लेखणीतून मांडली याच संत साहित्याच्या लेखणीतून संविधान हे निर्मित आहे म्हणूनच संत व महापुरुषांचे महाराष्ट्रात व देशात आगळे वेगळे स्थान आहे पण अलीकडच्या काळात काही समाजातील माणसे संत व महापुरुष यांच्या बद्दल आकसित बुद्धी वापरून काहीतरी बोलून प्रसिद्धी घ्यायची हे बरोबर नाही वास्तविक पाहता कुणी थोर, मोठे, विद्वान या सर्वांनी विचार करून बोललं पाहिजे .अशा बोलण्यामुळे  समाजात जातीय तेढ निर्माण होते समाजामध्ये असंतोष निर्माण होतो आणि याला वेगळे वळण येऊन समाजामध्ये असून असंतोष निर्माण होतो म्हणून कीर्तनातून प्रवचनातून व्याख्यानातून राजकीय व्यासपीठावरून संताबद्दल महापुरुषाबद्दल बोलल्याबद्दल काहीतरी कायदा झाला पाहिजे. आणि त्या कायद्याच्या कलमानुसार असे बोलण्यावर बंदी आली पाहिजे  कारण संत व महापुरुष हे सर्व जातिधर्मांना एका विचारमंचावर आणण्याचे जगातील एक मोठे साधन आहे.

 ह.भ.प.मोहनानंद महाराज पुरंदावडेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या