रत्नत्रय प्रि प्रायमरी स्कूल व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी दहिगावची गुणवत्ता प्रेरणादायी : अनंतलाल दोशी

 

रत्नत्रय प्रि प्रायमरी स्कूल व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी दहिगावची गुणवत्ता प्रेरणादायी : अनंतलाल  दोशी  

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 06/05/2025 :

रत्नत्रय प्रि प्रायमरी स्कूल व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी दहिगावचा शैक्षणिक वर्ष 2024 - 25 चा वार्षिक  निकाल 2 मे रोजी घोषित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष  अनंतलाल रतनचंद दोशी तर दहीगाव हायस्कूल दहीगाव चे माजी मुख्यध्यापक तुकाराम किर्दक आणि चंद्रकांत दीक्षित हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविक व निकाल वाचन  मुख्याध्यापक सतीश हांगे यांनी केलें. व त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. 

सदर प्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतलाल दादा दोशी म्हणाले " आजचा हा दिवस विद्यार्थी पालक यांच्यासाठी अत्यंत आनंदाचा आहे कारण वर्षभर घेतलेल्या परिश्रमाचा निकाल आज घोषित झाला. सर्वच विद्यार्थ्यांची गुणवत्ता अत्यंत उत्कृष्ट आहे. यामुळेच  रत्नत्रय प्रि प्रायमरी स्कूल व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी दहिगावचे काम प्रेरणादायी आहे.  या सर्वांचे श्रेय मी या शाळेचे सर्व शिक्षक व  पालक यांना देतो. भविष्यातही अशाच प्रकारची गुणवत्ता ठेवून स्वतःचे व शाळेचे नाव उज्वल करावे असे आव्हान त्यांनी केले.  ते पुढे म्हणाले विद्यार्थी घडविण्यात पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. पालक हे मुलांचे पहिले शिक्षक आणि आदर्श असतात, ज्यामुळे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्यास मदत होते. पालकांनी मुलांच्या शिक्षणात सक्रिय सहभाग घेणे, त्यांना प्रेरणा देणे आणि योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे".  आभार शुभांगी सावंत  यांनी मानले. सदर प्रसंगी  रत्नत्रय प्रि प्रायमरी स्कूल व स्पर्धा परीक्षा ॲकॅडमी दहिगावचे चेअरपर्सन रोनक चंकेश्वरा, रत्नत्रय प्रि प्रायमरी स्कूल नातेपुतेचे चेअरपर्सन वैभव शहा, रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे संचालक  अमित गांधी,  आयटीआयचे  प्राचार्य गजेश जगताप ,  गणेश खंडागळे , निलेश शेंडे , शिवराम नाळे , पूजा चव्हाण,   पालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या