सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ संपन्न

 

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ संपन्न 

 वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

 दिनांक 23/5/2025 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर अकलूज येथील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीरिंग व कॉम्पुटर इंजिनीरिंग स्टुडन्ट असोसिएशन याच्या संयुक्त वि‌द्यमाने अंतिम वर्षाच्या विध्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ संपन्न झाल्याची  माहिती कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. सचिन पांढरे यानी दिली. 

कार्यक्रमात अंतिम वर्षाच्या वि‌द्याथ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. वि‌द्यार्थ्यांनी कॉम्पुटर विभागात त्यांच्या काळातील सर्वात गोड आठवणी आणि अनुभव शेअर केल्या. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तसेच २०२४ च्या बॅचमधील प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या शैक्षणिक प्रवास आणि कामगिरीबद्दल कौतुकास्पद सन्मान करण्यात आला.

महावि‌द्यायलयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे व कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. सचिन पांढरे यांनी उपस्थित वि‌द्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्याच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी ऑफिस सुप्रीटेंडेन्ट  शब्बीर शेख, समन्वयक पोपटराव भोसले उपस्थीत होते.

अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, महावि‌द्यालयीन व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा  स्वरुपाराणी जयसिंह मोहिते पाटील, संस्थेचे सचिव  राजेंद्र चौगुले यांनी शुभेच्छा दिल्या.

 कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. इंद्रजित इनामदार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनीरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचार्यांनी व कॉम्पुटर इंजिनीरिंग स्टुडन्ट असोसिएशन मधील वि‌द्याथ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या