एअर व्हाईस मार्शल हिलाल अहमद

 एअर व्हाईस मार्शल हिलाल अहमद   

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 07/05/2025 :

ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वितेबद्दल बोलताना एक निधड्या छातीचा वीर दुर्लक्षित करून चालणार नाही…

‘हिलाल अहमद'… एक अस्सल कश्मिरी मुसलमान !

आपल्या शत्रूवर हल्ला करण्यासाठी जी राफेल विमानं आज सज्ज आहेत.. त्या पाचही विमानांच्या पायलट टीमचा 'कॅप्टन' होता हिलाल अहमद ! भारतीय वायूसेनेचा ॲम्बेसिडर म्हणून फ्रान्समध्ये या पाचही विमानांचा ताबा घेऊन पाचही पायलटना टेकऑफसाठी आदेश देण्याचं काम हिलालनं केलं होतं. 

...आणि हा माणूस कुणा नेत्याच्या किंवा पक्षाच्या मेहरबानीनं या पदावर पोहोचला नाही. स्वत:च्या टॅलेन्टवर, हिमतीवर आणि हृदयात असलेल्या अफाट देशभक्तीच्या जोरावर त्यानं हे पद मिळवलं आहे. जम्मूच्या नगरोटा सैनिक स्कूलचा 'टॉपर’ असलेला हिलाल सुरुवातीला पायलट म्हणून वायूसेनेत भरती झाला. नंतर हळूहळू आपल्या टॅलेन्ट आणि जिद्दीच्या बळावर तो फ्लाइट लेफ्टनंट - विंग कमांडर - ग्रुप कॅप्टन अशा पायर्‍या चढत-चढत २०१९ ला 'एयर कोमोडोर' पदावर पोहोचला ! आज तो 'एअर व्हाईस मार्शल' आहे.

हे करताकरताच डिफेंस सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (डीएसएससी) ची पदवी घेतली.. एवढंच नव्हे, तर अमेरीकेच्या 'एयर वॉर कॉलेज'मधून डिस्टिंक्शन मध्ये डिग्री मिळवली. एलडीए मध्ये 'स्वार्ड ऑफ ऑनर' जिंकलेला एकमेव काश्मिरी मुसलमान आहे तो !

'हिली' या लाडक्या नांवानं वायूसेनेत लोकप्रिय असलेल्या हिलालला वायुसेना मेडल आणि 'विशिष्ट सेवा मेडल' मिळालेलं आहे. 'राफेल'च्या आधी मिराज-2000, मिग-21 आणि किरण विमानांचं तब्बल ३००० तासांचं दुर्घटनामुक्त उड्डाणांचं निष्कलंक रेकॉर्ड असलेल्या हिलाल  अहमद सारखे वीर जवान आपल्या धर्मनिरपेक्ष भारताची 'शान'आहेत. विमानं वगैरे फक्त 'साधनं' आहेत. शत्रूराष्ट्रांना धाक असेल, तर या भारताच्या या जिगरबाज लढवय्या जवानांचा आहे. 

ऑपरेशन सिंदुरच्या निमित्तानं, आपल्या वायुसेनेची ताकद असलेल्या एअर व्हाईस मार्शल हिलाल अहमद आणि टीमला कडकडीत सलाम !

- किरण माने.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या