🟡 मनाची शुद्धता 🔴


 🟡 मनाची शुद्धता 🔴  

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. (केदारनाथ येथून)

मुंबई दिनांक 19/05/2025 : दैनंदिन जीवनात काही प्रसंग असे येतात की कितीही शांत रहायचे ठरवले तरी राग येतो. चीड चीड होती. समोरची व्यक्ती अशी कशी वागू शकते, बोलू शकते? असा आपल्याला प्रश्न पडतो, खूप संताप होतो.

खरे तर पुढील व्यक्तीच्या वागण्या-बोलण्याचा आपण संताप करून काही उपयोग नसतो. कसे वागायचे ते त्यांनी ठरवायचे. राग अनावर झाला की जिभेवरील ताबा जातो त्यामुळे रागाच्या भरात काहीही बोलले जाते. ते नियंत्रण त्यांनी ठेवायचे असते.

आपण शांत राहून परिस्थिती हाताळू शकतो. त्यांची मानसिकता बिघडलेली असते तेंव्हा आपली स्थिर ठेवायची असते व त्रास करून घ्यायचा नसतो. रागात बोललेल्या गोष्टी मनाला लावून न घेता, राग शांत झाल्यावर चर्चा करून समस्या सोडवणे कधीही योग्य ठरते.

आजचा संकल्प

_राग अनावर झाल्यावर त्याचा आपल्या शरीरावर, मनावर व भावनांवर दुष्परिणाम होतो, मानसिक संतुलन बिघडल्याने शाब्दिक तोल जातो हे लक्षात ठेवून रागावर नियंत्रण ठेऊ.

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या