सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची जयंती साजरी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 28/5/2025 :
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची १४२ वि जयंती उत्सहात सादर करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण ढवळे, महाविद्यालय समन्वयक, कार्यालयीन अधिक्षक, सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्यानी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर मेकॅनिकल विभागाचे प्राध्यापक शुभम कुलकर्णी यांनी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या कार्याची थोडक्यात माहीती दिली.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक म्हणून प्रा. शुभम कुलकर्णी तर सूत्रसंचालन तसेच आभार प्रदर्शन प्रा.दिपक शिंदे यांनी केले.
0 टिप्पण्या