🟪 मोजे निरगुडे इंदापूर येथील कॅनल फुटी प्रकरणी कार्यकारी अभियंता कुराडेबाई संबंधित सतरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार : विठ्ठल राजे पवार

 


🟪 मोजे निरगुडे इंदापूर येथील कॅनल फुटी प्रकरणी कार्यकारी अभियंता कुराडेबाई संबंधित सतरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल  करणार : विठ्ठल राजे पवार

 वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 25/5/2025 :

निरगुडे येथील कॅनल कधीही फुटू शकतो बाबत 15 दिवसांपूर्वी सिंचन भवन पुणे येथील कार्यालयात संघटनेचे कार्यकर्ते व पत्रकारांनी समक्ष अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता कुऱ्हाडे बाई यांच्या कार्यालयात लेखी तक्रार केली आहे, परंतु कार्यकारी अभियंता कुराडे बाईंनी लाखो रुपयांची लाच खाऊन प्रकरण दडपले  असल्याचा संघटनेचा आरोप आहे.

पंधरा दिवसांपूर्वी कुऱ्हाडे यांना भ्रमणध्वनी व लेखी निवेदनाद्वारे तसेच इंदापूर तहसीलदार व पीआय भिगवण यांच्याकडे निरगुडे येथील नवा मुठा कॅनल ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच हनुमंत बबन काजळे व किरण उर्फ संग्राम सातव तसेच अनेकांनी 36 ठिकाणी नव्या मुठा कॅनॉलला डॅमेज करून सायपण द्वारे कोट्यवधी रुपयांची पाण्याची चोरी केल्याचे कार्यकारी अभियंता कुराडे बाई यांना लेखी पत्राद्वारे व भ्रमणध्वनीवरून किमान 20 ते 25 वेळा तक्रार केलेली आहे.

सिंचन भवन येथील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता कुराडे बाई व संबंधितांनी नवीन मोठा कालव्यातून पाणी चोरी करण्यासाठी आर्थिक हितसंबंधातून हनुमंत काजळे सुरेश खाडे किरण उर्फ संग्राम सातव यांना प्रोत्साहन देत शासन प्रशासन ची मोठी फसवणूक केल्याबाबतची भ्रष्टाचार करून शासकीय कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांच्या विरोधात शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठलराजे पवार यांनी लेखी निवेदनाद्वारे कॅनॉलच्या कार्यकारी अभियंता कुराडे बाई, वरिष्ठ अधीक्षक अभियंता, उपअभियंता, कॅनॉल निरीक्षक ज्युनिअर अभियंता तसेच पोलीस स्टेशन भिगवन, तहसीलदार इंदापूर तालुका व कॅनलचे अधिकारी यांच्याकडे पंधरा/16 दिवसांपूर्वी लेखी तक्रार करून सदर ठिकाणी मुठा कॅनलच्या काँक्रीट ब्रिज व भराव टाकलेल्या कॅनलला मोठ्या प्रमाणामध्ये फुटून धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांना मोठा धोका निर्माण होईल अशा आशयाचा पत्र व्यवहार कुराडे बाई यांना लेखी निवेदनाद्वारे पोज घेऊन व भ्रमणध्वनीवरून संपर्क केलेला होता.

मात्र कार्यकारी अभियंता कुराडी बाई व अधीक्षक अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार देऊन भ्रमणध्वनी द्वारे संपर्क करून कारवाई करण्याची मागणी केली असता त्यांनी जाणीवपूर्वक केली आहे, कुऱ्हाडे व अधीक्षक अभियंता यांनी जाणीवपूर्वक कारवाई न करता काजळे भरणे व किरण सातव यांच्याकडून पाच लाख रुपयाची लाच घेऊन सदरचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला छत्रपती साखर कारखान्याची निवडणूक होस्तोर कोणतीही कारवाई करू नये, फक्त निवेदन स्वीकारा पण कारवाई करू नका असे आदेश आमदार भरणे यांनी कुराडे बाईंना विमानतळावर दिले होते असे कॅसेट रेकॉर्डिंग असल्या बाबतची तक्रार विठ्ठल राजे पवार यांनी केली आहे,

उद्या बंद गार्डन पोलीस स्टेशन येथे एफ फायर दाखल करणार विठ्ठल राजे पवार

रविवारी रात्री 11 वाजता सोशल मीडिया सोबत बोलताना विठ्ठल राजे पवार म्हणाले की उद्या सोमवार दिनांक 26 मे रोजी विभागीय आयुक्त पुणे विभाग,  पुणे जिल्ह्याचे सिंघम कलेक्टर व पुणे जिल्ह्याचे एसपी यांची भेट घेऊन कार्यकारी अभियंता कुराडी बाई मुख्य अध्यक्ष अभियंता तसेच उप अभियंता कॅनॉल इन्स्पेक्टर उपाभियंता ज्युनिअर इंजिनिअर यांच्या विरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या प्रोत्साहन देणे भ्रष्टाचार करून आरोपींना मदत करणे आमदार व मंत्री यांना चुकीचे कार्य करण्यास सहकार्य करणे दप्तर दिरंगाई कर्तव्यात कसूर तसेच नागरिकाची सनद, कॅनल अधिनियम कायद्यान्वये बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे संबंधितांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार हे स्वतः करणार आहेत, ते म्हणाले की यासंदर्भात मी किमान 40 ते 45 फोन कार्यकारी अभियंता कुराडेबाई अधीक्षक अभियंता उपअभियंता जुनेर इंजिनिअर पोलीस स्टेशन व तहसीलदार तसेच माननीय कलेक्टर यांना समक्ष भेटून तक्रार केली होती त्यावेळी कलेक्टर साहेब यांनी तहसीलदार यांना भ्रमणध्वनीवरून कार्यवाही करण्याच्या संदर्भात पंधरा दिवसांपूर्वी भ्रमणध्वनीवरून फोन करून आदेश दिले होते मात्र तहसीलदार कार्यालय इंदापूर यांनी देखील कोणतीही कारवाई केली नसल्याबाबतचा खेद विठ्ठलाचे पवार यांनी व्यक्त केला आहे. राजे पवार म्हणाले की संबंधितांना निवेदन देऊन कारवाई करण्याच्या व कॅनलचे नुकसान जीवित हानी शासकीय संपत्तीचे नुकसान होऊ नये, नवीन मोठा कॅनल तीस ते पस्तीस ठिकाणी साहेबांसाठी डॅमेज केल्याने फुटू शकतो इतकी मोठी गंभीर तक्रार असताना देखील करण्यासाठी कार्यकारी अभियंता कुराडे बाई यांनी त्या ठिकाणी सायपनद्वारे पाणी चोरी करण्यासाठी हनुमंत बबन काजळे व किरण उर्फ संग्राम सातव तसेच इतर यादी 36 ठिकाणी कॅनलला डॅमेज केलेले होते तसेच सर्व पुरावे कार्यकारी अभियंता कुराडेबाई व अधीक्षक अभियंता सिंचन भवन पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे व समक्ष केलेली होती त्यावेळी काही पत्रकार देखील उपस्थित होते.

लेखी तक्रार केलेली होती तरीदेखील  कार्यकारी अभियंता कुराडी बाई व अधीक्षक अभियंता उपअभियंता यांनी संगणमत करून संबंधित ग्रामपंचायत सदस्य हनुमंत काजळे किरण उर्फ संग्राम सातव इतर यांच्यावर कोणती कारवाई केलेली नाही, राजे पवार म्हणाले की कार्यकारी अभियंता कुराडे बाई व संबंधितांचे माझ्याकडे रेकॉर्डिंग असून कुऱ्हाडे बाई व अधीक्षक अभियंता संबंधित सर्व अधिकारी तसेच निरगुडे ग्रामपंचायतीचे सदस्य हनुमंत बबन काजळे व किरण उर्फ संग्राम सातव, सरपंच सुरेश तानाजी खाडे यांच्यासह 17 ते 18 जणांवर शासकीय मालमत्तेचे नुकसान पाणी चोरी, विनापरवाना कॅनल डॅमेज करून सायकल कनेक्शन करणे, नवा मोठा कॅनलला जेसीबी हाय स्पीड बोर ब्लाकटिंग मशीन साह्याने भगदाड पाडून ३० ते ३६ ठिकाणी सायकल कनेक्शन जोडले आहे त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका पोचवण्याचा कार्यकारी अभियंता कुऱ्हाडी बाई यांच्या संगणमताने प्रयत्न केल्यामुळे संबंधितांवर सदोष मनुष्यवादाचा तसेच शासकीय संपत्तीचे करोडो रुपयांचे नुकसान केल्याबाबतचा fir फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी बाबतची मागणी करणार असल्याचे सांगितले,

शासकीय संपत्तीचे नुकसान, पाणी चोरी करण्यास कार्यकारी अभियंता कुराडे बाई, अधीक्षक अभियंता तसेच तालुक्याच्या आमदार दत्तात्रेय भरणे यांच्यावर विधानसभेतून कायमस्वरूपी निलंबनाची कठोर कारवाई करा, विठ्ठल राजे पवार.

संघटनेने केलेल्या तक्रारीनंतर कार्यकारी अभियंता कोराडी बाई यांच्या मोबाईल रेकॉर्डिंग वरून अशी दिसते की एअरपोर्टवर सदरबाबत इंदापूर तालुक्याचे आमदार, माजी मंत्री यांनी हस्तक्षेप करून कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न केलेले त्या दोघांचाही यामध्ये हस्ताक्षेप असल्याने माननीय मुख्यमंत्री यांनी दत्तात्रेय भरणे यांचा कायमस्वरूपी राजीनामा घ्यावा त्यांनी अनेक स्वरूपाचे असे गुन्हे झालेले त्यामध्ये ते सहभागी आहेत तसेच, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर आरोपीस मदत करण्याच्या संदर्भात फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी विठ्ठल राजे पवार यांनी केली आहे.

राजे पवार म्हणाले की इंदापूर तालुक्यात मधील 400 ते 500 कोटी रुपयांच्या गोणखणीत उत्खनन पाणी चोरी कॅनॉल डॅमेज करणे तसेच तत्कालीन तहसीलदार पाटील यांना संबंधित आरोपीकडून कारवाई करतेवेळी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या संदर्भात मंगळवारी माननीय मुख्यमंत्री तसेच जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे व पाणीपुरवठा मंत्री तसेच राज्याचे मुख्य सचिव , संबंधित खात्याचे सचिव यांची भेट घेऊन आमदार भरणे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील ग्रामपंचायत सदस्य हनुमंत बबन काजळे त्यांना सहकार्य करणारे किरण उर्फ संग्राम सातव, सरपंच सुरेश तानाजी खाडे यांच्या वर कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे देखील सांगितले. तत्पूर्वी सोमवार दिनांक 26 मे रोजी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये संबंधितांविरुद्ध एफ आय आर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी त्या ठिकाणी सत्याग्रह आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या