🟨 विचारधारा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, ( केदारनाथ येथून)
दिनांक 18/05/2025 :
आपण स्वतःला नेहमी प्रामाणिक वागण्या - बोलण्याची सवय लावायची. लबाडी करणाऱ्या लोकांची तात्पुरती वाहवा होते. सत्य काय ते कधी न कधी उघड होते. मग लबाडी उघड झाली की त्या व्यक्तीची किंमत शून्य होते.
समाजात आपण अशी अनेक उदाहरणे पाहतो. नकली व असली यातील फरक लक्षात आल्यावर नकली गोष्टी कचऱ्यात पडतात. क्षणात त्यांचे महत्त्व कमी होते.
सोन्याचे शेवटी सोनेच असते.
प्रामाणिकपणा हा सदगुण थोडा उशिरा लक्षात येतो पण लबाडीचा शॉर्टकट मारण्यात वेळ घालवण्यापेक्षा थोड्या उशीर लागला तरी चालेल पण प्रामाणिकपणे वागून ध्येय साध्य करणे कधीही चांगले.
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या