‼️जगातील सर्वात महागडी शाळा‼️

 ‼️जगातील सर्वात महागडी शाळा‼️  

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे, 

(केदारनाथ येथून)

 दिनांक 18/05/2025 :

शिक्षणावर होणारा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. काही शाळा अशा आहेत जिथे मुलांची वर्षाची फी एवढी असते की, त्या शाळेत प्रवेश घेण्यापूर्वी विचार करावा लागतो. मात्र जगात सर्वात महागडी शाळा आहे, या शाळेची फी एवढी आहे की, त्या ऐवजी महागडी मर्सिडीज कार सहज खरेदी करू शकतो. जगातील सर्वात महागडी शाळा स्विझर्लंड मध्ये असून, या शाळेत पन्नासहून अधिक देशांतील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. या शाळेची वार्षिक फी ही सुमारे एक कोटी रुपये आहे. या निवासी शाळेचे नाव इन्स्टिट्यूट ले रोझी असून, त्यास ले रोझी किंवा केवळ रोझी म्हणून संबोधले जाते. 

१८८० मध्ये पॉल एमिल कर्नल यांनी वॉडच्या कँटोन मधील रोले शहरात शॅटो डू रोझीच्या जागेवर स्थापन केलेली ही शाळा स्वित्झर्लंड मधील सर्वात जुन्या शाळांपैकी एक आहे. बर्न कँटोन मधील गस्टाड या स्की रिसॉर्ट गावात शाळेचा एक कॅम्प देखील आहे. मुख्य म्हणजे ले रोझीचा समावेश जगातील १५० सर्वोत्तम खासगी शाळांच्या द स्कूल्स इंडेक्स मध्ये आणि स्वित्झर्लंड मधील टॉप १० आंतरराष्ट्रीय शाळात केला जातो. शाळेच्या कॅम्पस मध्ये ६९ एकर क्षेत्रावर मैदाने असून, तेथील एका देखण्या सरोवरात नौकानयन केंद्राची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. याखेरीज अन्य सर्व सुविधा या शाळेत विद्यार्थ्यांसाठी आहेत. या शाळेत स्पेन, बेल्जियम, इजिप्त, इराण, ग्रीस या देशांच्या राजघराण्यांतील मुले शिक्षण घेतात. कारण, सर्वसामान्यांना इथली फी परवडत नाही.

सौजन्य दैनिक पुढारी

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या