विधी की संस्कार ?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 23/5/2025 :
बौद्ध हा धर्म नाही तो धम्म आहे. धर्मामध्ये देव ,स्वर्ग, नरक, परंपरा चालीरीती, आणि विधी येतात. परंतु धम्मामध्ये माणूस, माणसाचे मन, विज्ञानवादी दृष्टिकोन येतो.
त्याचप्रमाणे विधी म्हटले की कर्मकांड आले. विधी चा अर्थ धार्मिक कृती, दैव, प्रारब्ध, नशीब यावर अवलंबून असते.
परंतु संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा गुणाकार याचा अर्थ स्वतःमधील गुण वाढवायचे आणि स्वतःमधील दोष कमी करायचे त्यासाठी संस्कार केले जातात. परंतु याउलट स्वतःमधील दोष वाढवण्यासाठी आणि गुण कमी करण्यासाठी विधी केले जातात.
संस्कार म्हणजे जीवन मूल्य असलेली तत्व. ही तत्व कालाप्रमाणे बदलली जातात संस्कार ही संकल्पना प्रत्येक पिढीमध्ये बदलत असतात. काल जे योग्य होते ते आज योग्यच असेल असे नाही.
एकंदर पाहता विधी आणि संस्कार यामध्ये बराच फरक आहे. विधी हा माणसाला अज्ञानात ठेवण्याचे काम करतो. परंतु संस्कार माणसाला ज्ञानी बनवतो. संस्कार हा माणसाला माणूस घडवण्यासाठी मदत करतो.
त्यामुळे बौद्ध धम्म हा विज्ञानवादी धम्म आहे परंतु आज काळ बौद्ध समाजातील या शब्द सर्रास वापरला जातो जलदान विधी, लग्नविधी नामकरण विधी तरी असे शब्द वापरून आपण मात्र बुद्धांच्या विज्ञानवादी धम्माचा अवमान करत आहोत.
आपण विज्ञानवादी बौद्ध धम्मात वागताना विधी सारखे शब्द वापरून आपण अज्ञानी असल्याचे दाखवून देत आहोत. काळानुसार माणसाला बदलले पाहिजे. त्यामुळे विधी हा शब्द देखील आपल्या धम्मामध्ये नसावा. असे माझे मत आहे.
बौद्ध धम्म स्वीकारून माणूस थोडा बदलला आहे .माणूस माणसात आला आहे. परंतु आपल्या विचाराने
योग्य काय आणि अयोग्य काय हे तो आपल्या बुद्धीला विचारून ठरवत नाही. अजूनही रूढी आणि परंपरेत गुंतलेला आहे. हेच यावरून सिद्ध होते.
विधी की संस्कार याविषयी योग्य तो निर्णय विविध सामाजिक संघटनांनी घ्यावा. अशी माझी नम्र विनंती आहे.
संजय सखाराम पवार
खांडोत्री, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी
मो.न.9137440340
0 टिप्पण्या