🔵 रुद्राक्षाचं पाणी प्यायले तर तब्येतीला मिळतात ३ फायदे

 🩺   *हेल्थ मंत्रा*    🩺

  🔵 रुद्राक्षाचं पाणी प्यायले तर तब्येतीला मिळतात ३ फायदे  

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. ( केदारनाथ येथून)

दिनांक 18/05/2025 :

रुद्राक्षाला हिंदू धर्मात फार धार्मिक महत्व आहे. रुद्राक्षाला भगवान शिवाचा आशीर्वाद मानलं जातं. त्यामुळे जास्तीत जास्त शिवभक्त गळ्यात रुद्राक्षाची माळ घालणं पसंत करतात. पण तुम्हाला माहीत नसेल की, आयुर्वेदाच्या दृष्टीकोनातूही रुद्राक्षाला खूप फायदेशीर मानलं जातं. बऱ्याच लोकांना माहीत नाही की, रुद्राक्षाचं पाणी प्यायल्यानं आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर होतात. याबाबत माहिती देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे. 

काय सांगतात एक्सपर्ट्स?

आयुर्वेदात एमडी असलेल्या डॉ. मनीषा मिश्रा यांनी त्यांच्या इन्स्टा हॅंडलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत त्यांनी सांगितलं की, रुद्राक्ष एक फार शक्तीशाली बी आहे. ज्याला आयुर्वेदात ऊर्जा देणारं एक औषध मानलं जातं. यात अनेक नॅचरल इलेक्ट्रोमॅग्नेटिक गुण आढळतात. ज्याचे अनेक फायदे मिळतात.

🟣 रुद्राक्षाचं पाणी पिण्याचे फायदे

*ब्लड प्रेशर राहतं कंट्रोल

आयुर्वेदिक डॉक्टरांनुसार, रुद्राक्षाचं पाणी नियमितपणे प्याल तर हाय बीपीच्या रूग्णांना फायदा मिळतो. यानं शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि हृदय निरोगी राहतं.

*वाढतो फोकस

डॉक्टरांनी सांगितलं की, रुद्राक्षाचं पाणी मानसिक संतुलन चांगलं ठेवण्यास मदत करतं. यानं नर्वस सिस्टीम शांत राहतं. ज्यामुळे तणाव, चिंता आणि मानसिक थकवा दूर होतो. तसेच तुमचा कामावरील फोकस वाढतो.

*इम्यूनिटी वाढते

रुद्राक्षाची माळ गळ्यात घालत्यानं किंवा त्याचं पाणी प्यायल्यानं रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते. ज्यामळे शरीराला अनेक रोगांसोबत लढण्याची शक्ती मिळते.

🟡 कसं तयार कराल पाणी?

रुद्राक्षाचं पाणी तयार करण्यासाठी रात्री एका भांड्यात स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात चांगल्या गुणवत्तेचे रुद्राक्ष टाका. हे पाणी रात्रभर तसंच झाकून ठेवा. सकाळी हे पाणी गाळून प्या. नियमितपणे हे पाणी प्याल तर तुम्हाला अनेक शारीरिक आणि मानसिक फायदे मिळतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या