🟣 विचारधारा 🟢
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. ( केदारनाथ येथून)
दिनांक 18/05/2025 :
Mother's day झाला, आईचे एक दिवस कौतुक झाले, स्टेटस ला फोटो पडले, Likes आल्या, पुढे काय? सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत आईचे रूटीन सुरू झाले असेल, होय ना?
आपल्याला या पृथ्वीतलावर जन्माला घालणाऱ्या आईचा फक्त एक दिवस असतो का? ती आहे म्हणून आपला प्रत्येक दिवस आहे. एक दिवस आई घरात नाही ही कल्पना करा. बघा कसे होईल.
आई वाचून सगळे अडते मग ती चांगली धडधाकट, आरोग्यसंपन्न हवी ना? घरातील प्रत्येकाने तिच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. तिचा आहार ती व्यवस्थित घेते का? तिला व्यायामासाठी वेळ मिळतो का? पुरेशी विश्रांती मिळते का?
आई-बाबांच्या आरोग्याची दररोज काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. फक्त एक दिवस नाही. आले ना लक्षात?
सौ. स्नेहलता स. जगताप

0 टिप्पण्या