🟦 आत्मपरीक्षण करा
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 23/5/2025 :
ऍक्टिव्ह पॅसिव्ह या दोन शब्दांचे अर्थ मी समजावून सांगितले पाहिजेत असे नाही. आपल्या देशात 2014 पासून ऍक्टिव्हिस्ट कार्यकर्त्यांची मांदीयाळी झाली आहे.
कुणीही उठाव स्वतःला ऍक्टिव्हिस्ट म्हणून जाहीर करावं व या देशातील धर्म परंपरा सरकार यांच्या बद्दल काहीही बोलावे क्षणाक्षणाला सुप्रीम कोर्टाचे दार ठोठवावे व चांगल्या रीतीने चाललेल्या प्रगतीला खिळ घालावी असे एनजीओ चे मोठे अड्डे झाले आहेत. हे ऍक्टिव्हिस्ट पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व युट्युब यावर पोस्ट टाकणारे असतात. काही कलाकार विशेषता वॉलीवुड कलाकार हे पण ऐनवेळ एक्टिविस्ट होत असतात.
आपणास डॉक्टर विक्रम साराभाई यांचे नाव माहीतच असेल यांच्या पत्नी या नर्तिक होत्या व यांची मुलगी मल्लिका साराभाई ही पण नर्तिका होती पण ती नर्तिका असण्यापेक्षा स्वतःला एक्टिविस्ट म्हणून घेत होती व त्याप्रमाणे ही विशेषता14 साली मोदी सरकार सत्तेवर आल्यावर प्रचंड प्रमाणात एक्टिव झाली. मग डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली जाऊन मोदींच्या प्रत्येक कृतीवर अगर न केलेल्या कृतीवर आपले विचार मांडणे केजरीवाल यांच्या पक्षात जाऊन भारतीय जनता पक्ष व मोदी यांच्यावर तोडसुख घेणे, आपण गुजराती आहोत व मोदी पण गुजराती आहेत त्यामुळे आपण मोदींच्या बरोबरीच्या आहोत म्हणून रात्रंदिवस निरनिराळ्या मार्गांनी या मलिकाताईंनी मोदी द्वेष पसरवणे खेरीज अन्य कोणताही ऍक्टिव्ह पणा केला नाही. मोदींच्या स्वभावानुसार मोदींनी याकडे दुर्लक्ष केले.
एकदा काय झाले मल्लिका साराभाई यांच्या आई मृणालीनी साराभाई या वृद्धापकाळमुळे निधन पावल्या डावे राजकारणी, काँग्रेसची राजकारणी व आम आदमीचे राजकारणी या सर्वांनी मल्लिका साराभाई यांचे सात्वन करण्यासाठी धाव घेतली.
मी एवढी मोठी कार्यकर्ती असताना मोदी यांनी माझे सांत्वनासाठी आले नाहीत व किंवा साधे पत्रही लिहिले नाही अगर मला सात्वनाचा फोन केला नाही म्हणून या मल्लिका ताईनी या दुःखाच्या काळात सुद्धा थयथयाट केला होता.
मला हे समजत नाही. रात्रंदिवस तुम्ही एखाद्या व्यक्तीचा द्वेष करता तो अडचणीत येईल यासाठी प्रयत्न करता व या व्यक्तीने पुन्हा आपल्यास आपल्या दुःखाच्या काळात सहानुभूती दाखवण्यासाठी यावे अशी अपेक्षा का करता ? हे एका नामवंत प्रसिद्ध व्यक्तीचे वर्तन आहे.
पण आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कसे वागतो हे आपण आत्मपरीक्षण करत नाही.
आपला नेहमीचा ठेका असतो मी जशास तसे वागेन पण हे समर्थन फक्त स्वतःपुरते असते. पुढच्या माणसाने जशास तसे वागले नाही पाहीजे. मी कशाही वागलो त्या व्यक्तीला कितीही त्रास दिला त्या व्यक्तीला बरबाद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या माणसांच्या बरोबर हात मिळवणी केली, त्याच्या शत्रूला प्रोत्साहन दिले तरी सुद्धा माझ्या दुःखाच्या काळात या व्यक्तीने येऊन माझे सात्वन करावे अशी आशा अपेक्षा आपण बाळगत असतो. हे किती चुकीचे आहे.
आपण कसेही वागणार त्या माणसाने मात्र सह्रयपणे ,सज्जन पणाने वागावे ही आपण अपेक्षा का करतो ?
अशी अपेक्षा करणे म्हणजे आपण चांगुलपणाशी प्रतारणाच करत आहोत.
आपल्याला सुद्धा असे अनुभव अनेक वेळा येत असतात या अनुभवातून आपण आपली पुढील वर्तणूक ठरवत असतो अशावेळी आपण आत्मपरीक्षण करून मी जर त्या व्यक्तीशी चांगले वागलो नाही तर त्याच्याकडून मी अपेक्षा करणार नाही हे ठरवले पाहिजे हा मनाचा व्यायाम फार महत्त्वाचा आहे
"मनाचे व्यायाम" या आगामी पुस्तकातील आत्मपरीक्षण करा या प्रकरणातील संक्षिप्त भाग
ॲड. अनिल रुईकर
98 232 550 49
इचलकरंजी

0 टिप्पण्या