💢 भारतीय स्त्री व आत्महत्या
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 23/5/2025 :
हुंड्यासाठी व पैशासाठी छळ झाल्यामुळे भारतीय तरुण मुली आत्महत्या करतात हे प्रकार अलीकडे कमी घडत असले तरी काही वर्षांपूर्वी याचे प्रमाण मोठे होते त्यावेळी स्टोव्हचा भडका उडणे हे कायमचे झाले होते त्याविषयी एक मला छोटीशी कविता आठवते.
"ना नंणद बोले ना सासू पीटे
बहु को क्या हो गया सिर्फ स्टोव्ह फटे"
म्हणजे या मुलीचा छळ झाला नाही. तिच्या मृत्यू स्टोव्ह चा भडका उडल्यामुळे झाला असे दाखवण्यात येत होते.
स्री च्या मृतदेहावरील अस्ताव्यस्त कपडे
सुमारे वीस वर्षांपूर्वी सांगली येथे भालेराव नावाचे जिल्हा जिल्हा व सत्र न्यायाधीश होते त्यांच्यापुढे माझ्या एका पक्षकाराचे हुंडाबळी व आत्महत्यास प्रवृत्त केल्याबद्दल कामकाज चालले होते.
पोलीस पेपर प्रमाणे आरोपीने आपल्या पत्नीचा माहेरून पैसे आणावेत म्हणून छळ केला व त्याची परिणीती म्हणून त्या स्त्रीने शेतामध्ये असणाऱ्या विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली अशा आरोप होता.
मृत स्त्रीच्या शवविच्छेदनामध्ये तिच्या पोटात पाणी होते व शरीरावर जखमा होत्या व तिचे कपडे अस्ताव्यस्त झालेले होते.
मी अशा बचाव घेतला की तिच्या अंगावर जखमा आहेत याचा अर्थ ती विहिरीत पडताना तिला जखमा झाल्या आहेत व कपडे अस्ताव्यस्त आहेत याचा अर्थ तिने आत्महत्या केली नाही तो अपघात आहे.
न्यायवैद्यक शास्त्र काय सांगते
असा बचाव मी का घेतला कारण न्यायवैद्यक शास्त्रामध्ये भारतीय स्त्रियांच्या बद्दल असे मत नोंदवलेले आहे की कोणतीही भारतीय स्त्री आत्महत्या करताना आपल्या मृत्यूनंतर ही आपले अवयव इतरांना दिसू नयेत म्हणून आपले कपडे आपल्या अंगाबरोबर घट्ट बांधून मृत्यूनंतर आपला कोणताही स्रीत्व दर्शवणारा अवयव दिसू नये अशी काळजी घेत असते ही भारतीय स्त्रियांची मानसिकता आहे मग अशा स्त्रीने उंचावरून उडी मारून आत्महत्या केली अगर विहिरीत अगर नदीत उडी मारून आत्महत्या केली.
मी वर नमूद केल्याप्रमाणे आपले कपडे घट्ट बांधून आत्महत्या करते हा नियम नाही पण न्यायवैद्यक शास्त्रात अनुभवी डॉक्टरनी आत्महत्या खून का अपघात याबद्दल तपासणी करताना त्या स्त्रीने कपडे कसे घातले होते याचा अभ्यास करून हे ठरवलेले आहे. अर्थातच अनेक इतर गोष्टी पण या कामांमध्ये होत्या त्या सरकार पक्षाच्या पुरावा मला खोडता आला व स्त्रीच्या देहावर कपडे अस्ताव्यस्त होते हा माझा बचाव मान्य झाला.
गाजलेली आत्महत्या
आपल्या महाराष्ट्रात गेल्या सहा वर्ष एका तरुण मुलीच्या आत्महत्या बद्दल चर्चा ,हायकोर्ट ,पत्रकार परिषदा सुरू आहेत या दिशा सालीयानची आत्महत्या हा मोठा चर्चेचा विषय झालाय.
तपासी अधिकारी निष्काळजी
तिने उंचीवरून उडी मारून आत्महत्या केली असे निष्कर्ष तपासी अधिकारी यांनी काढला व त्याला पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरनी दुजोरा दिला आहे पण यांनी दोघांनीही जरा जरी न्यायवैद्यकशास्त्राचा अभ्यास केला असता तर त्यांनी मृततरुणीच्या अंगावर कपडे नव्हते त्या अर्थी ती आत्महत्या नसावी असा तपास केला नाही.
"न्यायवैद्यक शास्त्र मराठीतून" या आगामी पुस्तकातील "आत्महत्या खून की अपघात" या प्रकरणातील संक्षिप्त भाग
ॲड. अनिल रुईकर
98 232 55049
इचलकरंजी

0 टिप्पण्या