“सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती संपन्न”
फक्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई
दिनांक 31/5/2025 : सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च शंकरनगर, अकलूज या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे, महाविद्यालय समन्वयक, कार्यालयीन अधिक्षक, सर्व विभागाचे विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांचे हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देवून त्यांच्या महान कार्याची थोडक्यात माहिती देताना सांगितले कि अहिल्याबाई होळकर“सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती संपन्न”धर्मनिष्ठ होत्या. त्यांच्या कार्यामुळे त्या आजही आजरामर आहेत. त्यांच्या जीवनातून महिलांना नेतृत्व, नीतिमत्ता आणि कार्यकर्तुत्वाचा आदर्श मिळतो.
त्यानंतर मेकॅनिकल विभागाचे प्रा. विकास शिवशरण यांनी सुंदर अशा शब्दात अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी थोडक्यात मनोगत व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयक व सूत्रसंचालन म्हणून आनंद माने यांनी काम पाहीले.


0 टिप्पण्या