🟩 मनाची शुद्धता

 🟩 मनाची शुद्धता

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 15/05/2025 : कोणत्याही क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती म्हणजे आपल्यापुढे आदर्श असतो. त्या व्यक्ती विषयी आपल्या मनात आदराचे, कौतुकाचे   स्थान निर्माण होते, क्वचित हेवा वाटतो.

अशा व्यक्तीला आपण 'तुमच्या यशामागचे रहस्य काय?'  असे विचारतो. खरे तर  यशामागचे उघड सत्य हे असते की, मनातील जिद्द, कामातील सातत्य व चिकाटी, अविरत सराव व अभ्यासपूर्ण माहिती मिळवण्याची सवय.

क्षेत्र कोणतेही असू दे, ध्येय निश्चित झाले की लक्ष केंद्रित करून सातत्य व सराव करणे आवश्यक असते. यशस्वी होणाऱ्या प्रत्येकाने या टप्प्याने यश प्राप्त केलेले असते. हेच प्रत्येक यशामागील रहस्य असते.

आजचा संकल्प

_आपले ध्येय निश्चित करून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू. ध्येयप्राप्त होईपर्यंत जिद्द व चिकाटी ठेवू व यशस्वी होऊ._


सौ. स्नेहलता स. जगताप._

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या