राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत रत्नत्रय इंग्लिश कुलची बाजी
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 28/5/2025 : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव महाराष्ट्र राज्य तर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत रत्नत्रय इंग्लिश स्कूलने बाजी मारली. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते संपन्न झाला. बक्षीसाचा स्वीकार रत्नत्रय एज्युकेशन सोसायटीचे मार्गदर्शक संचालक व सदाशिवनगरचे सरपंच विरकुमार दोशी व कोषाध्यक्ष मिहीर गांधी यांनी स्वीकार केला.या प्रसंगी भारतीय जैन संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्यध्यक्ष केतन शहा, समाजरत्न रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा हे उपस्थित होते.
रत्नत्रय इंग्लिश स्कूल ची कु श्रेया नितीन राऊत इयत्ता सातवी ह्या विद्यार्थ्यांनीने ५वी ते ८ वी गटामध्ये प्रथम क्रमांक ( बक्षीस रोख रक्कम ५५५५ )पटकावला. कु.आर्या मनोज दोशी इयत्ता दहावी ह्या विद्यार्थ्यांनीने ८वी १०वी गटामध्ये प्रथम क्रमांक ( बक्षीस रोख रक्कम ५५५५ ) पटकावला असून कु.धनश्री मनोज नाळे हिचा चतुर्थ क्रमांक ( बक्षीस रोख रक्कम ११११ ) आलेला आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र शासन तर्फे आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत ८५० विद्यार्थी बसले होते यामध्ये रत्नत्रय इंग्लिश मिडीयम च्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत चमकदार कामगिरी करून संस्थेचे नाव उज्ज्वल केले आहे .या त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अनंतलाल रतनचंद दोशी, सचिव प्रमोद दोशी, उपाध्यक्ष विशाल गांधी संस्थेचे डॉ सतिश दोशी. रोनक चंकेश्वरा, अभिजीत दोभाडा, सुरेश धाईंजे, बबन गोफणे, वैभव शहा,अमित गांधी महावीर शहा संस्थेचे सर्व संचालक मंडळ व पालक वर्ग, मुख्याध्यापक दैवत वाघमोडे इत्यादींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.या स्पर्धेसाठी उपमुख्याध्यापिका सविता देसाई यांचे मार्गदर्शन लाभले..
0 टिप्पण्या