🟨 सहकार महर्षि अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राचे उद्घाटन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 23/5/2025 : शंकरनगर अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्राचे उद्घाटन हनुमंत कौलगे या पालकांच्या हस्ते संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. या सुविधा केंद्रामध्ये प्रथम व थेट द्वितीय वर्ष डिप्लोमा प्रवेश प्रक्रिया अर्जाची नोंदणी व अर्ज निश्चिती करता येणार आहे. सुविधा केंद्र सकाळी ०९:३० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत चालू असणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांना डिप्लोमा इंजीनियरिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची गैरसोय होऊ नये या हेतूने महाविद्यालयाचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डिप्लोमा इंजीनियरिंग प्रवेश प्रक्रिया सुविधा केंद्रामध्ये मोफत सोय देण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयामध्ये डिप्लोमा इंजीनियरिंगच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या दोन विद्या शाखा 2025 - 26 पासून सुरू करण्यात आले असून सदर सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण ढवळे यांनी केले आहे.

0 टिप्पण्या