मनाची शुद्धता

 

मनाची शुद्धता 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 05/05/2025 :

समाजात उच्च-नीच, गरीब-श्रीमंत असा भेदाभेद नेहमीच असतो. दुसऱ्याला कमी लेखणे हा अनेक जणांच्या स्वभावातील एक भाग असतो. विशेषतः स्वतः श्रीमंत आहोत हे दाखवण्याची अनेकजणांची चढाओढ असते.

ज्याच्याकडे भरपूर पैसे, संपत्ती, स्थावर मालमत्ता असे आहे हे लोक उंची वस्त्रे व दागदागिने घालून श्रीमंती दाखवण्याचा प्रयत्न करतात. भौतिक श्रीमंती खरेच इतकी महत्वाची आहे का?

आपल्याकडे सुसंस्कृत व संस्कारित मन, विचार व वर्तन असेल तर आपण जगातील खरे श्रीमंत. एक वेळ पैसा नसेल तरी चालेल पण नैतिक मूल्ये जपणारी, समोरच्याला माणूस समजणारी व माणसाप्रमाणे वागणारी व्यक्ती खरी श्रीमंत.

आजचा संकल्प

पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा गुणांनी, संस्कारांनी श्रीमंत होऊ व आपल्या श्रीमंतीची मुळे समाजात खोलवर रुजवण्याचा प्रयत्न करू.

सौ. स्नेहलता स. जगताप

            संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या