🟩 सहकार महर्षि अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या नवीन विद्याशाखा सुरू

 🟩 सहकार महर्षि अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या नवीन विद्याशाखा सुरू

 वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 23/5/2025 : शंकरनगर अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये डिप्लोमा इंजिनियरिंगच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन या दोन विद्याशाखा 2025 - 26 पासून सुरू झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. सध्या चालू असलेला ट्रेंड पाहता या दोन विद्याशाखांना मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी उपलब्ध झाल्याने संस्थेचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा  स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे दोन नवीन कोर्स सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. महाविद्यालयामध्ये यासोबतच कॉम्प्युटर इंजीनियरिंग, मेकॅनिकल इंजीनियरिंग, सिव्हिल इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, या विद्याशाखा उपलब्ध आहेत. महाविद्यालयामध्ये मुले व मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृहाची सोय उपलब्ध आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या