सरन्यायाधीश यांचे हार्दिक अभिनंदन !
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन :आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. (केदारनाथ येथून)
मुंबई दिनांक 15/05/2025 : मला सांगायला आनंद वाटतो की मी अमरावतीला एसीपी म्हणून तीन वर्षे होतो माझ्याबरोबर नवी मुंबईचे एसीपी संदानशिव होते आणि नोव्हेंबर 2005 मध्ये प्रमोशन वर अमरावतीला बदलून गेलो होतो आमची फॅमिली मुंबईतच होती मी ग्रामीण रेस्ट हाऊसला राहत होतो आणि वेळ मिळेल तसे गवई साहेबांच्या घरी जाणे होते.
गवळी साहेब त्यावेळेला बिहारचे राज्यपाल होते
आर एस गवई साहेब बिहारचा राज्यपाल झाल्यानंतर अमरावतीला घरी आले होते मोठा कार्यक्रम ठेवला होता गवई साहेबांचे सर्व घरचे लोक नातेवाईक हजर होते मोठा कार्यक्रम होता त्यावेळी मी आणि एसीपी संधान शिव साहेब पण हजर होतो.
साहेबांची मिरवणूक ही निघाली होती भूषण गवई साहेब त्यावेळी औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश होते तेही आले होते.
त्या मिरवणुकीत भूषण गवई साहेब वडिलांच्या गाडीत बसले नाहीत ते त्यांच्याच गाडीत होते लोकांनी त्यांना विचारलं आम्हीही तेथे होतो साहेबा बरोबर का बसली नाही तेव्हा त्यांनी ते राज्यपाल आहेत मी हायकोर्ट न्यायाधीश आहे
त्यामुळे प्रोटोकॉल पाळला पाहिजे असे म्हणाले बऱ्याच गोष्टी आम्हाला त्यांच्याबरोबर बोलता आल्या साहेबा बरोबर तर आम्ही नेहमीच ते विजीटला आले आम्ही हजर असायचो त्यांची आई त्यांच्या ज्युनिअर कॉलेजच्या प्रिन्सिपल होत्या त्यांची आमची जास्त ओळख होती आम्हाला अमरावतीला राहायचे नव्हते परत मुंबईला बदली पाहिजे होती आणि साहेबांना बदलीचे गाराने घालत होतो एका दिवशी आर आर पाटील साहेब अमरावतीत आले होते दोघेही सरकारी रेस्ट हाऊसला होते तेव्हा त्यांनी आमच्या बदली बद्दल आर आर पाटलांना शब्द टाकला होता पण बदली काही आर आर पाटलांनी केली नाही
त्यानंतर साहेब येऊन जाऊन असायचे भूषण गवई साहेबांचे ते दोन दिवस आणि त्याने वडला बाबत न बसण्याचे सांगितलेले कारण अद्याप आमच्या आठवणीत आहे त्यांच्या आई खूपच प्रेमळ होत्या त्यांच्या घरी अन्नक्षेत्रच सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असेल शहरापासून ते खेड्यापाड्यातील लोक घरी गवई साहेबांच्या आईना भेटायला येत जेवण वगैरे झालं की काहीतरी कारण सांगून जाण्याला खर्च नाही म्हणून एसटीचा खर्चही घेत अशा बऱ्याच काही आठवणी होत्या त्याच दरम्यान प्रतिभाताई राष्ट्रपती झालेले होत्या त्यांचे घर बंदच असायचे त्यामुळे आम्ही गवई साहेबांच्या आईच्या सानिध्यात कायम असायचं बऱ्याच गोष्टी त्या सांगायच्या समाजाच्या अडचणी समाजाची परिस्थिती साहेबांचं दूर जाणं मुलांची माहिती आम्हाला त्या वेळ मिळेल तशा सांगत अशी आमची एक अविस्मरणीय अमरावतीची नोकरी झाली आणि ज्यांची भेट झाली तेच आज भारत सरकारचे सरन्यायाधीश झाले आहेत मनापासून भूषण गवई साहेबांचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !
हनुमंत शिंदे

0 टिप्पण्या