“सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयाची १००% प्लेसमेंटसह उज्ज्वल वाटचाल"
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 26/5/2025 :
अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च, शंकरनगर अकलूज मधील तृतीय वर्ष पदविका २०२४-२५ इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी विभागामध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपनी मध्ये १००% प्लेसमेंट झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी दिली. तसेच मागील वर्षी प्रमाणे यावर्षी देखील शंभर टक्के प्लेसमेंटची आशा व्यक्त केली. महाविद्यालयामधील शैक्षणिक व विद्यार्थ्यांना मिळत असणाऱ्या प्लेसमेंट सुविधा पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले.
सदर निवडी बद्दल ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, महाविद्यालयाच्या विकास समिती अध्यक्षा स्वरूपाराणी जयसिंह मोहिते पाटील, ट्रस्टचे सचिव राजेंद्र चौगुले व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण ढवळे यांनी अभिनंदन केले.व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.

0 टिप्पण्या